मोबाईलवर स्वतःच रिडिंग घ्या, अन् वीज बिल भरा!

कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रिडिंग घेणे शक्य होत नसल्याने, ग्राहकांनी जर मोबाईल अ‍ॅपद्वारे रिडिंग पाठवले तर त्यांना रिडिंगनुसार बिल उपलब्ध करुन देता येईल.

213

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रिडींग पाठवून व देयके भरुन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी केले आहे. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत राऊत यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला संवेदनशील करण्याचे महावितरण व्यवस्थापनाला निर्देश दिले. खरं तर महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे रिडिंग पाठवून वीज बिल देण्याची सुविधा ही याआधीही सुरू होती. पण जेव्हा या वीज बिलांचा ग्राहकांना शॉक बसत होता, तेव्हा ऊर्जा खात्याकडून याविषयी लोकांना का सांगण्यात आलं नाही, हा प्रश्न आता आहे.   

मोबाईलद्वारे रिडिंग घेऊन वीज बिले देणे सोपे

ग्राहकांना ऑनलाईन व मोबाईल अ‍ॅपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सुद्धा जे ग्राहक याचा वापर करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करुन घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कोरोना काळात रिडिंग न घेता बिले पाठविल्याच्या ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. म्हणून, शक्यतो मीटर रिडिंग घेऊन वीज बिले पाठवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रिडिंग घेणे शक्य होत नसल्याने, ग्राहकांनी जर मोबाईल अ‍ॅपद्वारे रिडिंग पाठवले तर त्यांना रिडिंगनुसार बिल उपलब्ध करुन देता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

(हेही वाचाः महाराष्ट्रातील असेही काही घोटाळे ज्यांची आजही होते चर्चा!)

ग्राहकांची सेवा हेच महावितरणचे ब्रीद

राज्यात विजेचे दर कमी करण्याठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत असून, वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. वीज खरेदीसाठी पॉवर एक्सचेंजमधून दररोज साधारणतः 1100 ते 1800 मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्सचेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करुन, स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ग्राहकांची सेवा हेच महावितरणचे ब्रीद असून ग्राहक महावितरणचे दैवत आहेl. कोरोना काळात महावितरणचे कर्मचारी हे ग्राहकांना अव्याहत सेवा देत आहेत. थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून, त्या खपवून घेतल्या जाणार नाहीl. महावितरण व प्रशासन हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.