वीजग्राहकांचा गो-ग्रीन Digital वीजबिलांना कमी प्रतिसाद!

वीजग्राहकांनी वीजबिलासाठी ‘गो ग्रीन’ या पर्यायाचा वापर केल्यास ग्राहकांना दरमहा दहा रुपयांच्या सवलतीसह ई-मेल तसेच SMS द्वारे वीजबिले महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येते. मात्र या योजनेला ग्राहकांचा कमी प्रतिसाद असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश डिजीटल व्यवहार नागरिकांनी स्वीकारले असले तरी विजेचे बिल मात्र छापीलच असावे असा वीजग्राहकांचा आग्रह असल्याचे दिसून येत आहे.

छापील बिलाची मागणी

गो-ग्रीन या पर्यायाचा निवड केल्यास ग्राहकांना छापील बिलाऐवजी ई-मेल आणि SMS द्वारे वीजबिल उपलब्ध होते. या पर्यायाची निवड करणाऱ्या ग्राहकांना यापूर्वी दरमहा ३ रुपयांची सवलत देण्यात येत होती. परंतु जास्तीत जास्त ग्राहकांनी गो-ग्रीन पर्यायाची निवड करावी याकरता महावितरणने डिसेंबर २०१८ पासून सवलतीची किंमत १० रुपये एवढी वाढवली. त्यामुळे वर्षाला १२० रुपयांची सवलत मिळते. एवढी सवलत असूनही ग्राहकांकडून छापील बिलाची मागणी करण्यात येत आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या अक्षय चैतन्य आहारावर कामगार नाराज; उपहारगृहातील व्हिडिओ व्हायरल)

महावितरणचे वीजबिल मोबाइल अ‍ॅपमध्ये सुद्धा उपलब्ध होते. पण ग्राहकांकडून छापील बिलाची मागणी होते. महावितरणच्या भांडुप परिमंडळात २४ लाख ७७ हजार ५२८ वीजग्राहक आहेत. त्यापैकी केवळ १.१७ टक्के म्हणजेच २९ हजार ग्राहकांनी गो-ग्रीन पर्याय निवडला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here