Colestrol : ‘या’ तेलात जेवण बनवलं तर टळेल हाय कोलेस्ट्रॉलचा धोका

163

भारतात जास्तीत जास्त लोकांना हाय कोलेस्ट्रॉल संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. कारण भारतात जास्तीत जास्त लोक तेलकट पदार्थ अधिक खातात. बाजारात मिळणाऱ्या अनेक तेलांमुळे रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागतं जे डायबिटीस आणि हार्ट अटॅकचं कारण ठरतं. अशात कोलेस्ट्रॉलपासून वाचण्यासाठी योग्य तेलाची निवड करणं गरजेचं आहे.

जर तेलकट पदार्थांचं नियमित जास्त सेवन करत असाल तर याने तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल अधिक वाढतं. जेव्हा फॅटचं जास्त प्रमाणात निर्माण होऊ लागतं. तेव्हा कोलेस्ट्रॉल रक्तात इतर पदार्थांसोबत मिक्स होऊन प्लेक तयार करू लागतं. जे रक्तवाहिन्यांमध्ये चिकटून राहतं आणि यामुळे रक्तप्रवाह योग्यपणे होत नाही. जेव्हा आपल्या धमण्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल जास्त जमा होतो तेव्हा नसा ब्लॉक होतात आणि रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. जेव्हा ब्लड सर्कुलेशनसाठी जास्त जोर लावावा लागतो तेव्हा हाय बीपीची समस्या होऊ लागते.

(हेही वाचा Burkha : मुंबईतील महाविद्यालयातही मुसलमान विद्यार्थिनींचा बुरख्यासाठी धिंगाणा)

कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर हे तेल खा

प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, अळशीचं तेल त्या लोकांसाठी जास्त चांगलं असतं ज्यांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. हे तेल सलादमध्ये टाकूनही खाता येतं. तसेच हे तेल गरम करून इतर पदार्थांवर टाकूनही खाऊ शकता. अळशीचं तेल अळशीच्या बियांमधून काढलं जातं. यात फॅटी अॅसिड भरपूर असतं. तसेच यात ऑलिक अॅसिड, लिनोलिक अॅसिड आणि अल्फा लिनोलेनिक अॅसिडही भरपूर असतं. हे तेल बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. अशात या तेलाचं सेवन तुम्ही जेवण बनवण्यासाठी करू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.