पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत पदार्थ हवा आहे ? वाचा Murukku Recipe

Murukku Recipe : जर आपण चहासोबत काहीतरी नवीन, कुरकुरीत, क्रिस्पी खाण्याचा विचार करत असाल तर मुरुक्कू हा बेस्ट ऑप्शन आहे. टी टाईमच्या वेळी अनेकांना चटपटीत, कुरकुरीत, मसालेदार स्नॅक्स खायला आवडतात.

111
पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत पदार्थ हवा आहे ? वाचा Murukku Recipe
पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत पदार्थ हवा आहे ? वाचा Murukku Recipe

मुरूक्कु म्हणजे पिळाची. Twisted ह्या शब्दापासून तयार झालेला हा तमिळ शब्द अगदी चपलख बसतो चकली ला नाही का तर ही भारतातील दक्षिणेकडे प्रसिद्ध असलेली तांदुळ आणि डाळीचे मिश्रण वापरून केलेली चकली. संध्याकाळच्या छोटी भुकेसाठी हा सर्वोत्तम पर्यार आहे.

संध्याकाळची भूक भागवण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना काही ना काही स्नॅक्स हवे असते. रोज ठराविक पदार्थ खायला कोणालाच आवडत नाही. अशावेळी जर आपण चहासोबत काहीतरी नवीन, कुरकुरीत, क्रिस्पी खाण्याचा विचार करत असाल तर मुरुक्कू हा बेस्ट ऑप्शन आहे. टी टाईमच्या वेळी अनेकांना चटपटीत, कुरकुरीत, मसालेदार स्नॅक्स खायला आवडतात. परंतु काहीवेळा काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल काय खावे याचा विचार करतो. अशावेळी आपण हे मुरुक्कू (Murukku Recipe) खाऊ शकतो. मुरुक्कू बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया.

(हेही वाचा – India’s Tour of Sri Lanka : भारताचा टी-२० संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना; गंभीर म्हणतो, राहुल द्रविडची जागा घेणं कठीण)

घटक
  • 300 ग्रॅम तांदळाची पिठी
  • 2 टेबलस्पून उडीद डाळीचे पीठ
  • 2 टेबलस्पून हरबरा डाळीचे पीठ (बेसन)
  • 2 टेबलस्पून लोणी
  • 1/4 टीस्पून मीरपुड
  • 1/2 टीस्पून ओवा
  • चवीनुसार मीठ
  • पीठ भिजवण्यासाठी पाणी गरजेनुसार
  • तळण्यासाठी तेल
पदार्थ बनवण्याची कृती
  • एका मोठ्या भांड्यात तांदळाची पिठी, बेसन,उडीद डाळीचे पीठ एकत्र करून घ्यावे
  • फुडप्रोसेसर मधे एकत्र केलेले तीनही पीठ, मीठ, मीरपुड, ओवा व लोणी घालून हळूच एक दोन वेळेस फुडप्रोसेसर फिरवावे. पीठाला ब्रेडक्रम सारखे टेक्शर येइल
  • आता पिठात हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घ्यावे व 10 मिनिटे झाकून ठेवावे.
  • आता कढईत तेल तापायला ठेवावे व चकलीची प्लेट लावून सोऱ्या तयार करून त्यात छोटा पिठाचा गोळा मळून भरून मुरूक्कु (चकली) पाडून घ्यावी
  • तापलेल्या तेलात तयार मुरूक्कु घालून मंद गँसवर तळून घ्यावे
  • तयार मुरूक्कु (Murukku Recipe) गरमागरम चहा बरोबर सर्व्ह करावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.