भारतातील सर्वात उंच एअर प्युरिफायर कुठल्या शहरात आहे? वाचा

हा एअर प्युरिफायर टॉवर सुमारे १ किमीच्या त्रिज्येतील हवा शुद्ध करण्यास सक्षम आहे.

102

भारतातील हवेचे प्रदूषण लक्षात घेता, दिवसेंदिवस मोकळ्या हवेत श्वास घेणं कठीण झालं आहे. त्यामुळे आता सरकारकडून एअर प्युरिफायरची ठिकठिकाणी निर्मिती करण्यात येत आहे. त्यानुसार भारतातील सर्वात उंच एअर प्युरिफायर टॅावर चंदीगढमध्ये उभारण्यात आलं आहे.

24 मीटर उंच प्युरिफायर

महत्त्वाचे म्हणजे हे २४ मीटर उंच टॅावर सुमारे एक किमी.च्या त्रिज्येमध्ये असलेली हवा शुद्ध करण्यासाठी सक्षम आहे. या २४ मीटर उंच प्युरिफायर टॅावरचं उद्घाटन मंगळवारी करण्यात आलं. या टॉवरची स्थापना चंदीगढमधील टॉप लिस्टेड प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. या प्रोजेक्टमध्ये सल्लागार म्हणून धरमपाल यांची नेमणूक झाल्यानंतर हा प्रोजेक्ट १०० दिवसांत पूर्ण करण्यात आला. धरमपाल यांनी या प्रोजेक्टचे उद्घाटन केले.

सर्वाधिक प्रदूषित ठिकाणी उभारणी

देशातील सर्वात उंच असा हा टॉवर मध्य मार्गावरील ट्रान्सपोर्ट लाईट पॉईंट (TPT) येथे उभारण्यात आला आहे. हा परिसर सर्वाधिक रहदारीचा आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हा एअर प्युरिफायर टॉवर सुमारे १ किमीच्या त्रिज्येतील हवा शुद्ध करण्यास सक्षम आहे. दिल्ली स्थित फर्म पायोस एअर प्रायव्हेट लिमिटेडून याची उभारणी करण्यात आली आहे.

chandigarhrevi1 1435857698243842049 20210909 121846 img2

आकर्षणाचे केंद्र

हे उपकरण श्वासोच्छवासासाठी या क्षेत्रात असलेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक दर्शवणार आहे. हवा शुद्ध करणारे यंत्र विजेवर काम करणारे आहे, असं प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष देबेंद्र दलाई म्हणाले. फेब्रुवारीमध्ये या उपकरणाच्या स्थापनेचे काम सुरू झाल्यापासून, टॉवर सामान्य लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. यापूर्वी पावसामुळे त्याचे उद्घाटन लांबले होते.

२३ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते सुमारे १ किलोमीटरच्या त्रिज्येसह १० हजार घनमीटर हवा शुद्ध करण्याची क्षमता असलेल्या स्मॉग टॉवरचे उद्घाटन करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.