Cricket Helmet : क्रिकेटसाठी हेल्मेट निवडण्याचे निकष कुठले? कुठलं हेल्मेट आहे सगळ्यात सुरक्षित?

Cricket Helmet : वजनानं हलकं तरीही मजबूत हेल्मेट कसं निवडायचं?

34
Cricket Helmet : क्रिकेटसाठी हेल्मेट निवडण्याचे निकष कुठले? कुठलं हेल्मेट आहे सगळ्यात सुरक्षित?
  • ऋजुता लुकतुके

हळू हळू उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की, भारतात पुन्हा एकदा क्रिकेट शिबिरांचा हंगाम सुरू होईल आणि पालकांची मुलांसाठी सर्वोत्तम क्रिकेट किट घेण्यासाठी झुंबड उडेल. फलंदाजांसाठी चांगली बॅट निवडणं जसं महत्त्वाचं तसंच सुरक्षेसाठी हेल्मेटही महत्त्वाचं आहे. वजनाने हलकी तरीही मजबूत अशी स्टीलची संरक्षक जाळी असलेली हेल्मेट क्रिकेटपटूंमध्ये लोकप्रिय आहेत. (Cricket Helmet)

(हेही वाचा – Apollo Hospital Share Price : चांगल्या तिमाही निकालांनंतरही अपोलो हॉस्पिटलचे शेअर का पडले?)

भारतात तरुणांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच क्रिकेट खेळायला आवडतं आणि गल्ली क्रिकेट असो की, मैदानात खेळायचं क्रिकेट लोक हिरिरीने क्रिकेटचा आनंद लुटतात. अगदी रस्त्याच्या मध्यावरही इथं क्रिकेटचा खेळ रंगलेला दिसतो आणि बॅट व चेंडू या खेळासाठी प्राथमिक गरजा असल्या तरी तुम्ही हार्ड टेनिस चेंडू किंवा लेदरच्या चेंडूने खेळत असाल तर तुमच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणं खूप महत्त्वाचं आहे. (Cricket Helmet)

(हेही वाचा – Jammu and Kashmir च्या उपराज्यपालांची मोठी कारवाई; दहशदवाद्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ)

हेल्मेटसाठी वापरलेलं मटेरिअल, धातूचं ग्रिल आणि तुमच्या डोक्याच्या आकारात फिट बसण्यासाठी करायच्या वेलक्रो ॲडजस्टमेंट या गोष्टी हेलमेट घेताना निर्णायक ठरतात. एबीएस हे मटेरिअल हल्ली हेल्मेट बनवताना वापरलं जातं. तर ग्रिल स्टेनलेस स्टीलची असतात. या गोष्टी असतील तर तुमचं हेल्मेट चांगलं आहे असंच म्हणावं लागेल. भारतात उपलब्ध होणारी चांगील क्रिकेट हेलमेट आणि त्याच्या किमती पाहूया. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ऑनलाईन साईटवरही तुम्हाला हेलमेट उपलब्ध होऊ शकतात. (Cricket Helmet)

(हेही वाचा – Calcutta High Court ने संघाच्या सभेला दिली परवानगी; राज्य सरकारने केलेला विरोध)

कंपनी

किंमत

वापरणाऱ्यांनी दिलेलं रेटिंग

शेरी मास्टरक्लास एअर स्टेनलेस स्टील

रु. ६,७९७

४.२/५

डीएससी ॲव्हेंजर पीआरओ

रु. २,२३६

४.१/५

एसजी ब्लेझटेक

रु. १,४४५

४.१/५

शेरी क्लासिक

रु. ३,१५०

४.१/५

डीएससी फोर्ट ॲडजेस्टेबल ग्रिल

रु. २,०७९

४.५/५

मूनवॉकर माईंड प्रोफेशनल

रु. ६,९९९

४.३/५

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.