पावसाळ्याच्या सुरूवातीला सीताफळांचा हंगाम सुरू होतो. गेल्या वर्षी सुद्धा ३१ मे २०२१ रोजी मार्केट यार्डात सीताफळाची पहिली आवक झाली होती. गेल्या वर्षी सीताफळांचा भाव ६० ते १२१ रुपये किलो होता. परंतु यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत सीताफळांना जास्त भाव मिळाला आहे. यंदा सीताफळांची किंमत ११० ते २११ रुपये किलो आहे.
( हेही वाचा : मुंबई पोलिसांसाठी आयुक्तांनी घेतला ‘BEST’ निर्णय!)
व्यापाऱ्यांची माहिती
सीताफळांची आवक प्रामुख्याने वळकी, पुरंदर तालुका, यवत, उरळी कांचन, राजगुरूनगर, खेड या भागातून आणि जिल्ह्यातून होते. यावर्षी सीताफळाला चांगळी मागणी राहील आणि चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मागील वर्षी कोरोनाचा फटका सीताफळांना बसला होता. अशी माहिती युवराज काची या व्यापाऱ्यांनी दिली आहे. जानेवारी अखेरपर्यंत सीताफळांचा हंगाम सुरू राहून हळूहळू आवक आणि सीताफळांच्या भावात वाढ होणार आहे तसेच सामान्य नागरिक सुद्धा आवर्जून सीताफळांची वाट पाहत असल्याची माहिती सुद्धा काही व्यापाऱ्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community