lifestyle : सीताफळाच्या बियांमध्येही असतात औषधी गुणधर्म, जाणून घ्या यामागचे कारण

540
lifestyle : सीताफळाच्या बियांमध्येही असतात औषधी गुणधर्म, जाणून घ्या यामागचे कारण
lifestyle : सीताफळाच्या बियांमध्येही असतात औषधी गुणधर्म, जाणून घ्या यामागचे कारण

रक्तवर्धक, बलवर्धक, वातशामक आणि मांसवर्धक ‘सीताफळ’ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते ह्रदयाचे आरोग्य सुधारण्याचे कार्य करते. यामध्ये जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. त्याला या फळाला पौष्टिक फळ मानले जाते. सीताफळात कॅल्शियम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व, बी वन, बी टू ही जीवनसत्त्वेही आढळतात. तसेच त्यात प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ आणि नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. सीताफळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. या फळाप्रमाणेच त्यातील बियाही आरोग्यासाठी गुणकारी आहेत, कारण सीताफळाच्या बियांमध्येही अनेक पोषक तत्त्वे असतात.

– सीताफळाच्या बियांमध्ये नैसर्गिकरित्या अँण्टीऑक्सिडंट असतात तसेच जीवनसत्त्व सी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते.

(हेही वाचा – Pro Govinda Competition : गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे )

– शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी या बिया फायदेशीर ठरतात. कारण या बियांमध्येही जीवनसत्त्व बी असते.

– सीताफळाच्या बिया खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहायला मदत होते. बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते.

– आयुर्वेदात अनेक औषधांमध्ये सीताफळाच्या बियांचा वापर केला जातो. या बियांमध्ये अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती असते.

– वजनवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीताफळाचे बी खूपच फायदेशीर आहेत. त्यासाठी तव्यावर भाजून या बिया खाऊ शकता.

-डोळ्यांच्या आरोग्यासाठी असलेले जीवनसत्त्व ए सीताफळांच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे सीताफळाच्या बियांचे चूर्ण खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

केसांसाठी गुणकारी…

  • सीताफळाच्या बियांचे चूर्ण पाण्यात उकळून त्याने केस धुतल्याने लिखा, उवा मरुन जातात. कोंडा, खवडे यांचा ज्यांना नेहमी त्रास आहे. त्यांनी शिकेकाई व सीताफळाच्या बिया एकत्र कुटून त्याच्या पाण्याने केस धुवावे. केस गळती होत असेल, तर सीताफळांच्या बियांना दूधासोबत वाटून केसांना लावावे.
  • केसगळती रोखण्यासाठी सीताफळाच्या बिया बकरीच्या दूधात उगाळून लावाव्यात.
  • केसांना नैसर्गिक चमक येण्यासाठी सीताफळाच्या बियांचे तेल केसांना लावतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.