मुंबईकरांनो, डबेवाल्यांच्या सेवेत होणार ‘हा’ मोठा बदल!

90

मुंबईच्या नोकरदार वर्गाचा जिव्हाळ्याचा असा विषय म्हणजे मुंबईचा डबेवाला. या मुंबईच्या डबेवाल्याने चाकरमान्यांच्या पोटाची खळगी गेली 130 वर्षांपासून भरली आहे. पण मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मात्र त्याच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. पण, त्यामुळे खचून जाईल तो डबेवाला कसला. हा मुंबईचा डबेवाला आता नवीन अंदाजात मुंबईकरांच्या भेटीला येणार आहे.

70 हजार ग्राहकांना होणार लाभ

कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांत डबेवाल्यांच्या व्यवसायावर झालेला परिणाम लक्षात घेता, त्यांनी आता ‘डबेवाला सेंट्रल किचन’ हा नवा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून डबेवाले आता मुंबईकरांच्या भेटीला येणार आहेत. या किचन व्यवसायाच्या माध्यमातून एका दिवसाला सुमारे 70 हजार ग्राहकांना जेवणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. डबेवाला किचनच्या माध्यमातून कायमस्वरुपी व्यवसायाची निर्मीती केली जाणार आहे.

सर्व प्रकारचं जेवण उपलब्ध

डबेवाला सेंट्रल किचनच्या माध्यमातून ग्राहकांना डबेवाल्यांकडून पौष्टिक जेवण खरेदी करता येईल. त्यामध्ये शाकाहारी, मांसाहारी जेवणाचाही समावेश असणार आहे. मुंबई शहरातील कोणत्याही भागातून ग्राहकांना संकेतस्थळावरून जेवणाची ऑर्डर नोंदवता येणार आहे.

( हेही वाचा: भूमिगत जल बोगद्याच्या कामात ‘मुंबई’चा जगात दुसरा क्रमांक! )

का घेतला निर्णय?

अत्यंत चोख आणि शिस्तबद्ध पद्धतीने केल्या जाणाऱ्या कामामुळे आणि अफलातून नियोजनामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची जगभरात ख्याती आहे; मात्र कोरोना काळात डबेवाल्यांचे सर्व जाळे विस्कटले. अनेकांनी आपल्या मूळ गावी जाऊन शेती करण्यास सुरुवात केली. शेती नसणाऱ्या डबेवाल्यांवर मिळेल ते काम करण्याची वेळ आली.त्यामुळे कायमस्वरूपी व्यवसाय म्हणून डबेवाल्यांनी सेंट्रल किचनची उभारणी करण्याचा निर्णय घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.