![](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-08T180830.035-696x377.webp)
-
ऋजुता लुकतुके
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, जागतिक व्यापारी युद्धाचं वातावरण यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये या आठवड्यात मोठी घसरण झाली आहे. अर्थसंकल्प आणि रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण सोडलं तर बाकी दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचा अनुत्साहच मोठा होता आणि परकीय गुंतवणूकदारांनी तर सध्या भारतीय बाजारांकडे पाठ फिरवली आहे. अशा नकारात्मक वातावरणात ग्राहकोपयोगी उत्पादनं बनवणारी कंपनी डाबर इंडियाही विक्रीच्या तडाख्यातून वाचू शकलेली नाही. (Dabur India Share Price)
डिसेंबर तिमाहीत कंपनीचे निकालही फारसे चांगले नव्हेत. कंपनीचा नफा गेल्यावर्षीच्या तुलनेत फक्त २ टक्क्यांनी वाढला. त्यामुळे मागच्या महिनाभरात डाबर इंडियामध्ये तब्बल १६ टक्क्यांची किंवा ११० अंशांची घसरण झाली आहे. अर्थसंकल्पाच्या आठवड्यात मात्र इतर एमएमसीजी कंपन्यांप्रमाणेच डाबर इंडियातही फारशी पडझड न होता फक्त २ टक्क्यांची मामुली घसरण झाली आहे. (Dabur India Share Price)
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : अखेर लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमचं उद्धाटन संपन्न, लखलखत्या फ्लडलाईट्समध्ये उजळून निघालं गद्दाफी )
त्यातच एक सकारात्मक बातमी आली आहे ती म्हणजे एलआयसी या देशांतर्गत सगळ्यात मोठ्या गुंतवणूकदार कंपनीने डिसेंबर २०२४ च्या तिमाहीपासून डाबर इंडियामधील आपली गुंतवणूक वाढवली आहे. नेस्ले, पतंजली फूड्स आणि प्रॉक्टर अँड गँबल यासारख्या इतर एफएमसीजी कंपन्यांबरोबरच डाबरमधील गुंतवणूकही एलआयसीने वाढवली आहे. एलआयसी ही देशातील सगळ्यात मोठी म्युच्युअल फंड कंपनी तर आहेच. शिवाय विमा क्षेत्रालाही शेअर बाजारात गुंतवणुकीची परवानगी मिळाल्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांमध्ये एलआयसीचं महत्त्व आणखी वाढलं आहे. (Dabur India Share Price)
आधीच्या ३.५० टक्क्यांच्या तुलनेत आता एलआयसीने डाबर इंडियातील आपली गुंतवणूक ४.६६ टक्क्यांवर नेली आहे. ही शेअरला स्थैर्य आणणारी बातमी ठरू शकेल. (Dabur India Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी वा गुंतवणुकीवर सल्ला देत नाही. लेखातील मतं जाणकारांची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community