दादर चौपाटी बीच
दादर चौपाटी बीच मुंबईच्या दादर नावाच्या उपनगरात आहे. या समुद्र किनाऱ्यावरून वांद्रे-वरळी सी लिंक ब्रिजचं विहंगम दृश्य दिसतं. हे दृश्य पाहण्यासाठी, जॉगिंग करण्यासाठी आणि सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी इथले स्थानिक लोक आणि पर्यटक याठिकाणी गर्दी करतात. दक्षिण मुंबईत असलेल्या या बीचवर इथले स्थानिक लोक संध्याकाळच्या वेळेला फेरफटका मारण्यासाठी, पहाटे योगासने किंवा विश्रांतीचा काही वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी वारंवार येत असतात. पण या बीचवर बसण्याची आणि भोजनालयांची व्यवस्था नसल्यामुळे पर्यटकांना थोडासा त्रास होतो. (dadar beach)
सध्या दादरचा हा समुद्रकिनारा स्थानिक कचऱ्याचे डंप यार्ड बनला आहे आणि शहरामधल्या वाढणाऱ्या प्रदूषणाचा बळी ठरला आहे. त्यामुळे इथलं एक वातावरण एकंदर अजिबात चांगलं वाटत नाही. पण सध्याचं महाराष्ट्र शासन हे दादर चौपाटीचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. (dadar beach)
(हेही वाचा – delhi mumbai expressway कधी पूर्ण होणार? काय आहे सद्य परिस्थिती?)
दादर चौपाटी बीचला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
सप्टेंबर ते मार्च हा दादर चौपाटी बीचवर जाण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. वर्षाच्या इतर महिन्यांमध्ये इथल्या वातावरणात उष्णता आणि आर्द्रता असते. त्यामुळे इथे थांबणं असह्य होऊ शकतं. (dadar beach)
दादर चौपाटी बीचला भेट देण्यासाठी टिपा
- हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी अजिबात अनुकूल नाही. इथे समुद्राची संपूर्ण किनारपट्टी कचरा आणि चिखलाच्या ढिगाऱ्याने भरलेली आहे. म्हणून, इथे यायचंच असेल तर सूर्यास्ताच्या आधी भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
- या व्यतिरिक्त या समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला कोणतेही पोलिस किंवा कोणत्याही सुरक्षा यंत्रणेची व्यवस्था केलेली नाही. म्हणूनच इथे संध्याकाळनंतर भटकू नये अशी शिफारस केली जाते.
(हेही वाचा – jivdhan fort वर गेल्यावर काय काय कराल आणि काय काय पाहाल?)
दादर चौपाटी बीचवर कसं जायचं
दादर चौपाटी बीचवर जाण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे पश्चिम टर्मिनसचं दादर हे आहे. दादर रेल्वे स्टेशनपासून हा समुद्रकिनारा अगदी जवळ आहे. रेल्वे स्टेशनपासून ते इथपर्यंत तुम्ही चालत जाऊ शकता. याव्यतिरिक्त स्थानिक टॅक्सी भाड्याने घेऊ शकता किंवा तुम्ही राज्य परिवहन मंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या बसेसने प्रवास करणं हे देखील निवडू शकता. अधिक आरामदायी प्रवासासाठी तुम्ही तुमच्या निवास स्थानावरून टॅक्सी कॅब बुक करू शकता. (dadar beach)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community