Data Analyst Salary : डेटा ॲनालिस्ट महिन्यालाल किती रुपये कमावतात? त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे

Data Analyst Salary : डेटा ॲनालिस्ट ही सध्याची हाय प्रोफाईल नोकरी आहे 

26
Data Analyst Salary : डेटा ॲनालिस्ट महिन्यालाल किती रुपये कमावतात? त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे
Data Analyst Salary : डेटा ॲनालिस्ट महिन्यालाल किती रुपये कमावतात? त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे
  • ऋजुता लुकतुके

इंटरनेटमुळे माहितीचं महाजाल आपल्यासमोर उघड झालं आहे. ही माहिती गोळा करणं आणि संकलित करणं तसंच योग्य ठिकाणी त्याचा वापर करणं यातून आपली निर्णय प्रक्रियाही सुधारत असते. असे निर्णय खासकरून उद्योगक्षेत्रात लाभदायक असतात. संपूर्ण माहितीनिशी घेतलेला निर्णय चांगली फळं मिळवून देऊ शकतो. त्यामुळेच डेटा ॲनालिस्ट या डेटाचं आकलन करून वर्गवारी करणाऱ्या तज्जाचं महत्त्व सध्या वाढलं आहे. (Data Analyst Salary)

(हेही वाचा- World Food Regulatory Summit : असुरक्षित अन्नामुळे ६० कोटी लोकांना आजार, दरवर्षी जगात ४ लाखांवर मृत्यू)

बाजारपेठेत कशाची चलती आहे, ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी नेमक्या काय आहेत, कुठल्या वयोगटात कुठल्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांना मागणी आहे इथपासून ते ग्राहकांचा आर्थिक स्तर ते काय खरेदी करू शकतात याचा अंदाज अशाप्रकारच्या विश्लेषणाची कंपन्यांना गरज असते. काहीवेळा सरकारी योजना किंवा विविध सर्वेक्षणांसाठीही डेटा विश्लेषण आवश्यक असतं. ही सर्व प्रकारची माहिती सोशल मीडिया, सर्वेक्षणं आणि इतर माध्यमातून उपलब्धही असते. ही माहिती किंवा डेटा ॲनालिटिकल टूल्स वापरून संकलित करणं हे डेटा ॲनालिस्टचं काम आहे. (Data Analyst Salary)

त्यासाठी त्यांना तगडा मोबदला दिला जातो. मशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा इंजिनिअरिंग अशी कौशल्य या ॲनालिस्टकडे असावी लागतात. ग्रासडोअर या वेबसाईटनुसार, भारतात सध्या डेटा ॲनालिस्टला वार्षिक ४ लाख ते १२ लाख रुपये इतका मोबदला मिळतो. डेटा ॲनालिस्टचा भारतातील सरासरी पगार हा वार्षिक ६.४ लाख रुपये इतका आहे. (Data Analyst Salary)

(हेही वाचा- Tirupati Prasadam : सरकारने मंदिरे हिंदू मंडळाच्या अखत्यारीत आणावीत; धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आवाहन)

तुमच्या अनुभवानुसार, हा पगार पुढे वार्षिक २० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. डेटा ॲनालिस्ट जर फ्रेशर असेल तर त्याचा पगार हा ४ ते ८ लाख रुपये वार्षिक असतो. मध्यम अनुभव असलेल्या डेटा ॲनालिस्टला ८ लाख ते १ लाख रुपये वार्षिक इतका पगार मिळतो. तर १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल तर १५ ते ३० लाख रुपये वार्षिक इतका पगार मिळू शकतो. (Data Analyst Salary)

सध्या सॉफ्टवेअर क्षेत्रात असलेले अभियंते कौशल्य विकास म्हणून डेटा ॲनालिसिसकडे पाहू शकतात. त्यासाठी अतिरिक्त ऑनलाईन कोर्स करून ते डेटा ॲनालिसिसकडे वळू शकतात. किंवा डेटा ॲनालिसिसचे नवीन अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. (Data Analyst Salary)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.