data analyst salary : भारतामध्ये डेटा विश्लेषकांचा पगार किती असतो?

107
data analyst salary : भारतामध्ये डेटा विश्लेषकांचा पगार किती असतो?

भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये डेटा विश्लेषकांचा पगार लक्षणीयरीत्या वेगळा असू शकतो. कारण त्या त्या शहराच्या राहणीमानाचा खर्च वेगळा असतो, डेटा विश्लेषण कौशल्याची मागणी आणि डेटा विश्लेषणावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या उद्योगांची संख्या या सर्व कारणांमुळे भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये डेटा विश्लेषकांच्या पगारात तफावत असू शकते.

भारतामध्ये डेटा विश्लेषकांना साधारणतः ४,५०,००० ते १२,००,००० एवढा वार्षिक पगार असतो. पण तरीही कामाचं ठिकाण, उमेदवारांना असलेला कामाचा अनुभव आणि त्यांचं कौशल्य यावर मुख्यत्वे त्यांना दिला जाणारा पगार अवलंबून असतो. (data analyst salary)

(हेही वाचा – Menopause चा हाडे व हृदयाच्‍या आरोग्‍यावर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो)

बंगळुरू :

बंगळुरू हे भारताचं टेक हब मानलं जातं. या शहरात असंख्य टेक कंपन्या, स्टार्टअप्स आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. या शहराच्या भरभराट होत असलेल्या टेक इकोसिस्टममध्ये डेटा विश्लेषण कौशल्याची मागणी उच्च भरपूर आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये बंगळुरू या शहरातले डेटा विश्लेषकांचे पगार सर्वाधिक आहेत.

मुंबई :

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. या शहराची बँकिंग, वित्तीय सेवा आणि सल्लागार संस्थांमध्ये मजबूत उलाढाल होत असते. त्यामुळे या सर्व क्षेत्रातल्या कंपन्यांना वेगवेगळ्या विश्लेषणात्मक कामांसाठी डेटा विश्लेषकांची आवश्यकता असते. मुंबईमध्ये डेटा विश्लेषकांचे पगार हे स्पर्धात्मक असतात. इथल्या कंपन्या इतरांपेक्षा जास्त पगार ऑफर करून चांगले डेटा विश्लेषक आपल्याकडे वळवू पाहतात. मुंबई शहराची ही स्थितीच या शहराला भारताचं प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून दर्शवते. मुंबई शहरात सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धात्मक वातावरण असतं. (data analyst salary)

(हेही वाचा – ICC Test Ranking : पाक विरुद्धच्या त्रिशतकानंतर हॅरी ब्रूकने विराट कोहलीलाही टाकलं मागे)

दिल्ली :

भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागांचा समावेश आहे. दिल्ली हे सरकारी संस्था, आयटी कंपन्या आणि सल्लागार कंपन्यांसारख्याच वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायांचं घर आहे. दिल्ली शहरामध्ये डेटा विश्लेषकाचा पगार हा व्यावसायिक कंपनी किती मोठी आहे आणि कंपनीचा अनुभव या गोष्टींवर आधारित असू शकतो.

हैदराबाद :

हैद्राबाद हे शहर भारतातलं एक प्रमुख IT आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास आलं आहे. या शहरामध्ये सॉफ्टवेअर कंपन्या, संशोधन संस्था आणि फार्मास्युटिकल कंपन्यांची लक्षणीय उपस्थिती आहे. हैदराबादमध्ये डेटा विश्लेषकांचे पगारही सामान्यतः स्पर्धात्मकच असतात. या शहरामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये डेटा विश्लेषकांसाठी चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. (data analyst salary)

(हेही वाचा – IRS Sameer Wankhede ‘या’ पक्षातून विधानसभा लढणार)

पुणे :

पुणे हे शहर आयटी क्षेत्र, उत्पादन उद्योग आणि शैक्षणिक संस्थांसाठी ओळखलं जातं. पुण्यामध्ये डेटा विश्लेषकांचे पगार हे मागणी, वैयक्तिक कौशल्ये आणि अनुभवावर आधारित असतात.

चेन्नई :

चेन्नईमध्ये आयटी कंपन्या, ऑटोमोटिव्ह उत्पादक आणि आरोग्य सेवा संस्थांचा पाया मजबूत आहे. चेन्नई या शहरामध्ये डेटा विश्लेषकांच्या पगारावर शहरातल्या उद्योगाची मागणी, कंपनीची प्रतिष्ठा आणि कंपनीचं शहरातलं ठिकाण यांसारख्या घटकांचा प्रभाव असू शकतो. (data analyst salary)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.