दौलताबाद किल्ला (Daulatabad Fort) हा मूळचा देवगिरी किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर जवळ असलेल्या दौलताबाद नावाच्या गावात स्थित असलेला एक ऐतिहासिक गड आहे. हा किल्ला म्हणजे ९व्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंत यादवांच्या राजधानीचा किल्ला होता. पुढे १३२७ ते १३३४ या कालावधीत हा किल्ला मुघलांची राजधानी म्हणून राहिला. त्यानंतर १४९९ ते १६३६ या कालावधीत अहमदनगरच्या मुघल शासकांची दुय्यम राजधानी होती.
६व्या शतकाच्या जवळपास देवगिरी हे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या कारवा मार्गांसोबतच औरंगाबादच्या जवळ असलेलं एक महत्त्वाचं शहर म्हणून उदयास आलं. या शहरात असलेला हा ऐतिहासिक किल्ला सुरुवातीला ११८७ सालच्या आसपास पहिला यादव सम्राट भिल्लमा व्ही. याने बांधला होता.
(हेही वाचा – RCMS : शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ १५ दिवसांपासून बंद; नागरिक त्रस्त)
त्यानंतर १३०८ साली उत्तर भारताच्या काही भागांवर राज्य करणाऱ्या अलाउद्दीन खलजीने हा किल्ला (Daulatabad Fort) ताब्यात घेतला होता. १३२७ साली मुहम्मद बिन तुघलकने दौलताबाद शहराचं नाव बदललं आणि आपली राजधानी दिल्लीहून या शहरात हलवली. दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर दौलताबाद येथे करण्यात आलं.
१४९९ साली दौलताबाद, अहमदनगर हे मुघल सत्तेचा भाग बनलं. मुघलांनी त्याचा दुय्यम राजधानी म्हणून वापर केला. १६१० साली दौलताबाद किल्ल्याजवळ असलेलं औरंगाबादचं खडकी नावाचं शहर हे मलिक अंबरने अहमदनगर नगरची नवीन राजधानी म्हणून स्थापन केलं होतं. दौलताबाद किल्ल्यावरची (Daulatabad Fort) तटबंदी अहमदगरवर शासन करणाऱ्या मुघल शासकांच्या अंतर्गत बांधण्यात आली होती.
(हेही वाचा – ratangad fort : रतनगड किल्ल्याचं नाव कोणाच्या “नावा”वरुन पडले?)
दौलताबादच्या किल्ल्याविषयी माहिती
दौलताबादचा डोंगरी-किल्ला हा सुमारे २०० मीटर उंच असलेल्या शंकूच्या आकाराच्या टेकडीवर उभे आहे. टेकडीच्या खालच्या उताराचा बराचसा भाग यादव घराण्याच्या शासकांनी कापून कमी केला. किल्ल्याचं शत्रूपासून संरक्षण होण्यासाठी ५० मीटर एवढ्या उभ्या बाजू करण्यात आल्या आहेत. या किल्ल्याच्या (Daulatabad Fort) वर जाण्याचे एकमेव साधन म्हणजे एक अरुंद पूल आहे.
तसंच एक दालन तयार केलेलं आहे. या दालनाच्या मध्यभागी प्रवेश दालनाला उंच पायऱ्या आहेत. प्रवेश दालनाचा वरचा भाग एका जाळीने झाकलेला आहे. वरच्या चौकीद्वारे जळत असलेल्या मोठ्या आगीच्या पालित्यांचा प्रकाश या जाळीतून प्रवेश दालनात पडतो. आजूबाजूच्या ग्रामीण भागात मोठ्या जुन्या तोफेचे नमुने पाहायला मिळतात. तसंच किल्ल्याच्या (Daulatabad Fort) मध्यमार्गावर शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी एका गुहेचे प्रवेशद्वार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community