Debit आणि Credit Card ने शॉपिंग करत असाल आणि ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या प्रत्येकासाठी ही माहिती आवश्यक असू शकते. अलीकडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने व्यापारी वेबसाइटवर ऑनलाइन मोडद्वारे पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड और क्रेडिट कार्ड टोकनायझेशन (Card Tokenization) करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे, तुम्ही कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून खरेदी करत असल्यास, शक्य तितक्या लवकर तुमचे कार्ड कार्ड टोकनाइज्ड करून घ्या. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एक मोठा बदल केला आहे. हा नियम 1 जुलै 2022 पासून देशभर लागू होणार आहे.
ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, RBI ने गेल्या वर्षी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड टोकनायझेशन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, ज्या अंतर्गत व्यापाऱ्यांना त्यांच्या सर्व्हरवर ग्राहक कार्ड डेटा सेव्ह करण्यास बंदी घालण्यात आली होती. 1 जुलै 2022 पासून, ऑनलाइन व्यापारी त्यांच्या ग्राहकांता डेबिट आणि क्रेडिट कार्ड डेटा जतन करू शकणार नाहीत. केंद्रीय बँकेने देशांतर्गत ऑनलाइन खरेदीसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकन स्वीकारणे अनिवार्य केले आहे. देशभरात कार्ड टोकन स्वीकारण्याची अंतिम मुदत 1 जानेवारी 2022 ते 1 जुलै 2022 पर्यंत सहा महिन्यांनी वाढवण्यात आली.
1 जुलैपासून काय होणार?
RBI ने म्हटले की, 30 जून नंतर म्हणजेच 1 जुलै 2022 पासून व्यापाऱ्याला ग्राहकाच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डेटा डिलीट करावा लागणार आहे. याचा अर्थ असा की, जर ग्राहकांनी कार्ड टोकनायझेशनसाठी संमती दिली नसेल, तर त्यांना कार्ड व्हेरिफाय व्हॅल्यू म्हणजेच CVV भरण्याऐवजी त्यांचे कार्ड तपशील जसे की नाव, कार्ड क्रमांक आणि कार्डची वैधता यांची माहिती द्यावी लागणार आहे. प्रत्येक वेळी ऑनलाइन पेमेंट करताना CVV देणं गरजेचं असणार आहे. तर दुसरीकडे, जर एखादा ग्राहक कार्ड टोकनायझेशन करण्यास सहमत असेल, तर त्याला/तिला व्यवहार करताना फक्त CVV आणि OTP याची माहिती द्यावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community