दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग (delhi mumbai expressway) १,३५० किमी लांबीचा, ८-लेन रुंद (१२-लेनपर्यंत विस्तारण्यायोग्य) बांधकामाधीन प्रवेश-नियंत्रित एक्सप्रेसवे आहे, जो भारताची राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीला आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबईशी जोडतो.
८ मार्च २०१९ रोजी सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या उपस्थितीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. (delhi mumbai expressway)
हा एक्सप्रेस वे सुरु झाला तर प्रवाशांना अनेक सुविधा प्राप्त होणार आहे. म्हणूनच लोक या एक्सप्रेसवे च्या प्रतीक्षेत आहेत. भूसंपादन खर्चासह एकूण प्रकल्पाचे मूल्य सुमारे रु. १,००,००० कोटी (~US$१३.१ अब्ज) आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
(हेही वाचा – 31 December 2024 : सावधान ! नाशिकमध्ये गुरुजींना बारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश)
प्रमुख वैशिष्ट्ये :-
लांबी : १,३५० किमी
लेन :
सुरुवातीला ८ लेन, मात्र १२ लेनपर्यंत विस्तारण्यायोग्य
वेग मर्यादा :
१२० किमी/ता
अंदाजे खर्च :
रु. १,००,००० कोटी (अंदाजे $१३.१ अब्ज)
पूर्ण होण्याची दिनांक :
ऑक्टोबर २०२५ पर्यंत अपेक्षित (delhi mumbai expressway)
(हेही वाचा – देशाच्या सागरी व्यापाराचा मुख्य आधार असेलल्या mumbai port बद्दल जाणून घेऊयात )
मार्ग :
हा एक्सप्रेसवे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधून जाणार आहे. हा मार्ग दिल्ली, गुडगाव, फरीदाबाद, अलवर, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत आणि मुंबई सारख्या प्रमुख शहरांना जोडला जाणार आहे.
लाभ :-
प्रवासासाठी कमी वेळ :
एक्सप्रेसवेमुळे प्रवासाचा वेळ २४ तासांवरून अंदाजे १२ तासांपर्यंत कमी होईल.
आर्थिक प्रभाव :
व्यापार आणि लॉजिस्टिकला चालना देणे, लॉजिस्टिक खर्च कमी करणे आणि स्पर्धात्मकता वाढवणे अशा गोष्टी अपेक्षित आहेत. (delhi mumbai expressway)
पर्यावरणीय प्रभाव :
पर्यावरणावरील वाईट प्रभाव कमी करण्यासाठी ग्रीन एक्सप्रेस लेन आणि वन्यजीव कॉरिडॉरचा समावेश करण्यात आला आहे.
वर्तमान स्थिती :
आत्तापर्यंत, एक्सप्रेसवेचे काही भाग आधीच कार्यरत आहेत, संपूर्ण प्रकल्प २०२५ च्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community