‘केस’ कापायला गेली आणि 2 ‘कोटी’ घेऊन आली

स्त्रियांचं सौंदर्य केसांत असतं असं म्हणतात. स्त्रीसाठी तिचे केस म्हणजे तिची ओळख असते. स्त्रीचे मोकळे केस भल्याभल्यांना भुरळ घालतात. सिनेमांत देखील स्त्रीचे केस हा कायमंच आकर्षणाचा विषय राहिला आहे. लहान असो किंवा मोठे प्रत्येक स्त्री आपल्या केसांच्या बाबतीत खूपच पझेसिव्ह असते. केस गळायला लागले की स्त्रिया हळहळतात. पण दिल्लीत एका सलॉनमध्ये तर चक्क एका महिलेचे केस जवळजवळ उडवल्याचाचं प्रकार घडला आहे.

दिल्लीतील एका सलॉनला राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पेशाने मॉडेल असलेल्या महिलेचे केस चुकीच्या पद्धतीने कापत तिच्या सुंदर केसांना खराब केल्यामुळे, तथाकथित सलॉनला हा दंड भरावा लागला आहे. सलॉन स्टाफच्या चुकीमुळे महिलेला आपले लांबसडक केस गमवावे लागले व त्यामुळे तिला प्रचंड मानसिक ताण आला. त्यामुळे याबाबत सलॉनवर कारवाई करण्यासाठी चक्क महिलेने न्यायालयात धाव घेतली.

(हेही वाचाः हे माहीत आहे का? तुमच्या ‘परफ्युम’ मध्ये आहे व्हेल माशाची ‘उलटी’)

काय आहे प्रकरण?

ही महिला 12 एप्रिल 2018 रोजी या सलॉनमध्ये केस कापण्यासाठी गेली होती. तिचा नेहमीचा हेअर स्टाईलीस्ट उपलब्ध नसल्यामुळे तिला दुसरा स्टाईलीस्ट देण्यात आला. महिलेच्या म्हणण्यानुसार, केस कापण्यासाठी तिने विशिष्ट सूचना देऊनही हेअर स्टायलिस्टने तिचे लांबसडक केस खांद्यापर्यंत कापले. केस कापण्यासाठी महिलेला सतत डोके खाली ठेवण्यास सांगितलं होतं त्यामुळे नेमके केसं कसे कापले जातं आहेत, हे मॅाडेलला समजले नाही.

न्यायालयाने ठोठावला दंड

याबाबतचा खटला जेव्हा न्यायालयात उभा राहिला तेव्हा सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती आर.के.अग्रवाल आणि डॉ.एस.एम.कांतीकर यांनी संबंधित सलॉनला दोन कोटींचा दंड ठोठावला. त्याचबरोबर महिला त्यांच्या केसांच्या बाबतीत अत्यंत सावध असतात आणि केस चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी त्या खर्च करत असतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

(हेही वाचाः रेल्वेच्या डब्यांत होणार फिरते रेस्टॉरंट… या सात स्थानकांत करणार उभारणी)

इतक्या वेळेत द्यावे लागणार 2 कोटी

मॉडेलचे लांब आणि निरोगी केस तिच्या कारकिर्दीतील प्रमुख घटकांपैकी एक होते. तिने यापूर्वी व्हीएलसीसी आणि पॅंटेने ब्रँडसाठी मॉडेलिंग केले होते. सलॅानमध्ये केस कापण्यासाठी गेलेल्या या मॅाडेलचे तिच्या सूचनांविरोधात केस कापल्यामुळे तिला मिळालेले मॉडेलिंगचे काम गमवावे लागले. यामुळे तिला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ज्याचा गंभीर परिणाम तिच्या लाइफ स्टाईलवर झाला, तिची लाइफ स्टाईल पूर्णपणे बदलली. यामुळे तिचं टॉप मॉडेल होण्याचं स्वप्नही भंग पावलं, असे या महिलेचे म्हणणे आहे. त्यामुळे सलॉनला दिलेल्या शिक्षेनुसार आठ आठवड्यांच्या आत महिलेला 2 करोड रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here