शुद्ध सोने देण्यासाठी केंद्र सरकारची ‘योजना’, इथे मिळतात सरकारने बनवलेली सोन्याची नाणी

भारतात सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोने आयात करावे लागते. दरवर्षी अंदाजे 60 टन सोन्याची भारत इतर देशांकडून आयात करतो. सोन्याच्या नाण्यांच्या आकर्षणामुळे किंवा त्या नाण्यांच्या संग्रहासाठी काही लोक सोने घेत असतात. त्यामुळे ही सोन्याची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय सुवर्ण नाणे (Indian Gold Coin) ही योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत असलेली सुवर्ण नाणी भारत सरकारद्वारे तयार करण्यात आली आहेत. 5 नोव्हेंबर 2015 रोजी केंद्र सरकारच्या सुवर्ण मौद्रीकरण कार्यक्रमातील तिसरी योजना म्हणून याची सुरुवात करण्यात आली. लोकांना देशी सुवर्ण नाणी उपलब्ध करुन देऊन सोन्याची आयात कमी करणे, हा या योजनेमागील मुख्य हेतू आहे.

(हेही वाचाः Debit आणि Credit Card ने शॉपिंग करताय? 1 जुलैपासून RBI ने केलाय मोठा बदल)

काय आहे वैशिष्ट्य?

या सोन्याच्या नाण्यांवर एका बाजूस राष्ट्रीय चिन्ह अशोकचक्र तर दुस-या बाजूस गांधीजींचे चित्र आहे. ही नाणी 999-24 कॅरेट शुद्ध आहे. तसेच या नाण्यांवर हॉलमार्क मानक देखील देण्यात आले आहे. कोणत्याही ग्राहकाला या योजनेद्वारे सोन्याचे नाणे किंवा बिस्कीट खरेदी करता येते. सध्या 5 आणि 10 ग्रॅमची सोन्याची नाणी आणि 20 ग्रॅमचे सुवर्ण बिस्कीट उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

कुठे मिळतील?

भारतीय सार्वजनिक उद्योगMMTC(Metals & Minerals Trading Corporation of India) च्या प्रमुख शहरांमधील आऊटलेटमध्ये ही नाणी विकत घेता येतील. तसेच इंडियन ओव्हरसीज बँक, फेडरल बँक, आंध्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, यस बँक, फुलकरी एम्पोरियम याठिकाणी देखील ही नाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच 1 आणि 2 ग्रॅमची नाणी सुद्धा लवकरच पोस्ट ऑफिस, ज्वेलर्समध्ये लवकरच उपलब्ध होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here