भारीच ना! आता मुंबईतील किल्ले बघायला आणखी मजा येणार!

मुंबईतील किल्ल्यांचा लवकरच चेहरामोहरा बदलणार आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील एकूण सहा किल्ल्यांच्या विकासाबरोबरच त्यांच्या जतन आणि संवर्धनाचे काम पुरातत्त्व संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईतील बदललेल्या किल्ल्यांचं नवं रूपडं बघायला आणखी मजा येणार असल्याची चर्चा मुंबईकरांसह किल्ले प्रेमींमध्ये होताना दिसतेय.

किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन

मुंबईतील सेंट जॉर्ज, शिवडी, वरळी, माहिम, धारावी, आणि वांद्रे या ६ किल्ल्यांच्या विकासाबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील किल्ल्यांच्या विकासासंदर्भात ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालक डॉ. तेजस गर्गे, अजिंक्यतारा कन्स्ल्टंटचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले हे किल्ले राज्य पुरातत्व संचालनालयाच्या अखत्यारित आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरातील सहा किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन पुरातत्व संचालनालयामार्फत करण्यात येणार असून या कामासाठी बाह्यसंस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे.

( हेही वाचा : गडकरींना पुन्हा एकदा कोरोनाची लागण! म्हणाले…)

सुशोभीकरणावर भर 

पुरातत्व संचालक यांनी किल्ल्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन विकास समितीकडून किती निधी मिळेल, पर्यटन विभागाकडून याबाबत काय करता येईल, याची माहिती घ्यावी अशा सूचना देशमुख यांनी दिल्या आहेत. मुंबईतील सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन व संवर्धन करण्यासोबतच किल्ल्यांच्या ठिकाणी सुविधा निर्माण करणे, किल्ले परिसराचा विकास करणे व किल्ल्यांवर विद्युतीकरण करण्यावरही भर द्यावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here