दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी आणि रांगोळींची आरास! खरं पाहता कोणताही हिंदू सण रांगोळीशिवाय अधुरा आहे. पण दिवाळीमध्ये रांगोळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पण काही लोक लक्ष्मीपूजनापासून रांगोळी काढतात. (dhanteras rangoli)
मात्र दिवाळीची खरी सुरुवात वसुबारसपासूनच होते. त्यामुळे या दिवसापासूनच रांगोळ्यांची आरास सुरु होते. म्हणून धनत्रयोदशीला रांगोळी काढली पाहिजे. मग प्रश्न असा येतो की कोणती रांगोळी काढायची? चला तर धनत्रयोदशीच्या रांगोळ्यांची एक झलक पाहुया.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : खासगी कॉलेजच्या प्राध्यापकांची निवडणूक कामातून मुक्तता नाही; पण…)
फुलांची आरास असलेली रांगोळी
रांगोळीमध्ये रंग भरण्याऐवजी तुम्ही विविध रंगांची फुले आरास असलेली रांगोळी तुम्ही काढू शकता. या रांगोळीमुळे एक वेगळीच शोभा येते आणि इतरांपेक्षा तुमची रांगोळी उठूनही दिसते. (dhanteras rangoli)
दिव्यांची रांगोळी
ही देखील एक चांगली कल्पना आहे. तुम्ही फुले व दिवे यांचे मिश्रण असलेली नवी रांगोळी तयार करु शकता. म्हणजे तुम्ही स्वस्तिक किंवा एखादं शुभ चिन्ह असलेला आकार काढून त्यामध्ये फुले आणि दिवे ठेवून ती रांगोळी सजवू शकता.
(हेही वाचा – Maharashtra Vidhansbaha 2024: महाराष्ट्रात वाजणार महायुतीच्या प्रचाराचे बिगुल; धुळ्यात पंतप्रधान मोदींची ८ नोव्हेंबरला सभा)
धनाच्या पेटीची रांगोळी
तुम्ही साधी रांगोळी काढून धनाची पेटी म्हणजेच धनाशी कळशी दाखवू शकता आणि त्याद्वारे तुम्ही धनत्रयोदशीच्या शुभेच्छाही देऊ शकता. ही रांगोळी सोपी आहे पण दिसायला आकर्षक असते. (dhanteras rangoli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community