dhanteras wishes : धनत्रयोदशीला कशा शुभेच्छा द्याल?

22
dhanteras wishes : धनत्रयोदशीला कशा शुभेच्छा द्याल?

दिवाळीचा सण म्हणजे आनंदाची बरसात जणू! सगळीकडे कंदिल, रोषणाई, छान छान दिवे, रंगीबेरंगी रांगळ्या आणि बरेच काही. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान, भाईबीज आणि असे अनेक सण दिवाळीचा भाग आहेत. हे सगळे सण आनंद देणारे आहेत.

अशा वेळी आपल्या प्रियजनांना आणि मित्रांना शुभेच्छांचे संदेश पाठवायला नको का? आता धनत्रयोदशीला पूजा करुन संदेश पाठवण्याची मज्जाच काही और असते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत धनत्रयोदशीचे खास संदेश! (dhanteras wishes)

(हेही वाचा – सरकारी जमिनीवर illegal mosque; तक्रार करणाऱ्या हिंदूना दाऊदच्या नावे धमकी)

१.
धन्वतरीचा हा सण,
आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

२.
आला आला दिवाळीचा सण
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा! (dhanteras wishes)

(हेही वाचा – Diwali 2024 : नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र)

३.
धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

४.
पणतीचा प्रकाश घरभर पसरू दे,
लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

(हेही वाचा – Maharashtra Vidhansbaha 2024: महाराष्ट्रात वाजणार महायुतीच्या प्रचाराचे बिगुल; धुळ्यात पंतप्रधान मोदींची ८ नोव्हेंबरला सभा)

५.
लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

६.
धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
शुभ औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! (dhanteras wishes)

(हेही वाचा – dhanteras rangoli : तुम्ही धनत्रयोदशीला रांगोळी काढता का?)

७.
दिव्यांची रोशणाई,
फराळाचा गोडवा,
अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

८.
माता लक्ष्मीची कृपा आपणांवर सदैव राहू दे…
यश आणि समृद्धी आपणांस कायम मिळू दे…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

(हेही वाचा – ajanta ellora caves : काय आहे अजिंठा लेण्यांचा भव्य दिव्य इतिहास?)

९.
रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने उजळू दे,
धन आणि आरोग्याची साथ लाभू दे!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.

१०.
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. (dhanteras wishes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.