मधुमेह दिन विशेष: तरुणमधुमेहींसाठी इन्सुलिन मोफत द्या!

जीवनशैलीच्या त्रासाने मधुमेहाचे वयोमान खालावले आहे. आता लहान मुलांमध्येही मधुमेह दिसून येत आहे. हे प्रमाण वयोमानानुसार मधुमेहग्रस्तांच्या तुलनेत कमी असले तरीही दुर्लक्षित करण्यासारखे नाही. या रुग्णांना तरुण मधुमेहग्रस्त असे संबोधले जात आहे. तरुण मधुमेहग्रस्तांसाठी मोफत इन्सुलिन द्या, अशी मागणी भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) दिल्लीत पत्रकार परिषदेत केली आहे.

वेळीच निदान होणे गरजेचे

शरीरातील साखरेची मात्रा नियंत्रित राखण्यासाठी इन्सुलिनची आवश्यकता असते. लहान मुलांना मधुमेह झाला तर इन्सुलिनशिवाय पर्याय नसतो, अशी माहिती अहमदाबाद येथील डॉ. बन्शी शाबू यांनी केली. तरुण मधुमेहग्रस्तांमध्ये टाइप १ आणि टाइप २ असे दोन्ही प्रकार आढळून येत आहेत. असेही, डॉ शाबू म्हणाले. तरुण मधुमेहग्रस्तांचे वेळीच निदान होणे गरजेचे आहे. भारतीय वैद्यकीय संघटना हा अहवाल तयार करत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.जे.ए.जयेलाल यांनी दिली.

(हेही वाचा : कोकणवासियांची विमानाला पसंती वाढली! बुकिंग फुल्ल…)

मधुमेहाबाबत काय सांगत आहेत डॉक्टर्स ?

साठ टक्के प्रौढ रुग्णांना स्वतःला मधुमेह असल्याची कल्पना नाही आहे. रुग्ण शरीरातील साखरेची मात्रा नियंत्रित पातळीच्याबाहेर गेल्यावर डॉक्टरांकडे येतात. मधुमेहाबाबतीत आम्ही दवाखान्यांमध्ये आठवड्याभरासाठी निळा दिवा लावून जनजागृती करणार आहोत. असे, भारतीय वैद्यकीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.जे.ए. जयेलाल यांनी सांगितले.

तर, संघटनेचे सचिव डॉ.जयेश लेले सांगतात, भारतासारख्या विकसित देशामध्ये मधुमेहाचे प्रमाण लक्षणीय आहे. पंचवीशीतलेही मधुमेहग्रस्ताने हैराण आहेत. पंचवीस वयोगटानंतर सर्वांनी चार महिन्यांतून एकदा शरीरातील साखरेची मात्रा तपासावी.

आंतरराष्ट्रीय मधुमेह संघटनेचे अध्यक्ष डॉ. शशांक जोशी आपले मत व्यक्त करताना म्हणतात, चाळीस दशलक्ष भारतीयांच्या शरीरात मधुमेहाची प्राथमिक अवस्था आहे. सत्तर दशलक्ष भारतीयांना मधुमेह आहे. दरवर्षाला चार लाख भारतीयांचा मधुमेहाने मृत्यू होतो आहे. आम्हांला मधुमेह नियंत्रित भारत हवा आहे.

चुकीचे पथ्य हे मधुमेहाचे प्रमुख कारण आहे. कॉलेस्ट्रोल आणि उच्च रक्तदाब सांभाळला की मधुमेह नियंत्रित राहतो. असे आयपीए डॉ.कमलेश तिवारी यांनी स्पष्ट केले.

मधुमेहग्रस्तांची नियमित डोळ्यांची तपासणी हवी. मधुमेह नियंत्रित राहिला नाही तर कायमस्वरुपी अंधत्व येते. असा, सल्ला नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश मराठे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here