ज्योतिर्लिंग मंदिरांबद्दल माहितीये? तर सहभागी व्हा, केंद्राच्या अनोख्या प्रश्नमंजुषेत…

119

पर्यटन मंत्रालय ‘देखो अपना देश’ या उपक्रमांतर्गत विविध पर्यटन केंद्रित विषय, संकल्पनांवर डिजिटल परिसंवाद आयोजित करत आहे. “75 डेस्टिनेशन्स विथ टूर गाईड्स” अंतर्गत ‘महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग मंदिरे’ यावर डिजिटल परिसंवादाचे (Digital Seminar) आयोजन पर्यटन मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. या मंदिरासंबंधित सर्व माहिती आता पर्यटन मंत्रालयाच्या समाजमाध्यमांवर उपलब्ध होणार आहे.

प्रश्नमंजुषेत आयोजन

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग मंदिरांविषयी सरकारने प्रश्नमंजुषा सत्राचे आयोजन केले आहे. #DekhoApnaDesh वेबिनार याअंतर्गत याचे आयोजन करण्यात आले आहे. ११ डिसेंबरपासून या प्रश्नमंजुषेला सुरूवात झाली असून ही स्पर्धा ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. शेवटी स्पर्धांनी दिलेली उत्तरे, घेतलेला वेळ यावर अनुसरून विजेते घोषित करण्यात येतील. अशी माहिती पर्ययन मंत्रालयाने दिली आहे.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

महाराष्ट्रात मोठ्या संख्येने धार्मिक व अध्यात्मिक ठिकाणे आहेत. ही ठिकाणे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि औंढा नागनाथ ही महाराष्ट्र राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिकच्या दक्षिण पश्चिमेस सुमारे 28 किमी अंतरावर स्थित आहे आणि ते चार ठिकाणांपैकी एक आहे जिथे सिंहस्थ मेळा (कुंभमेळा) आयोजित केला जातो. धार्मिक भावनेने मोठ्या संख्येने लोक येथे भेट देतात.

( हेही वाचा : आज होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांमध्ये संताप )

भीमाशंकर मंदिर

भीमाशंकर मंदिर हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमधील एक प्राचीन शिवमंदिर आहे, जे संपूर्ण भारतातील भाविकांना आकर्षित करते. पुणे जिल्ह्यात वसलेले हे भारतातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे भीमा नदीचे उगमस्थान देखील आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे औरंगाबाद येथे आहे, हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. त्याला घुष्मेश्वर असेही म्हणतात.

महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे 13 व्या शतकातील मंदिर आहे. औंढा नागनाथ हे उत्कृष्ट ज्योतिर्लिंग मानले जाते. हे पांडवांनी उभारलेले पहिले किंवा ‘आद्य ‘ लिंग मानले जाते. परळी वैजनाथच्या ज्योतिर्लिंग मंदिराला वैद्यनाथ असेही म्हणतात आणि त्याचा जीर्णोद्धार राणी अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. हे मंदिर टेकडीवर दगडांचा वापर करून बांधले आहे. अशी माहिती प्रादेशिक स्तरावरील गाईड उमेश नामदेव जाधव यांनी हे सादर केली आहे. तसेच देखो अपना देश डिजिटल परिसंवाद याअंतर्गत सदर माहिती पर्यटन मंत्रालयाच्या सर्व सामाजिक माध्यमांवर उपलब्ध आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.