सध्या ऑनलाईन पेमेंटद्वारे सर्व प्रकारची पेमेंट करणे अतिशय सोपे झाले आहे. मॉलपासून ते अगदी रस्त्याच्या कडेला असणा-या फेरीवाल्यांपर्यंत सगळीकडे या ऑनलाईन पेमेंटद्वारे व्यवहार होत असतात. पण आता स्मार्टफोन किंवा इंटरनेटशिवाय पेमेंट करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नवी सेवा सुरू केली आहे.
डिजीटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी निर्णय
स्मार्टफोन किंवा इंटरनेटची सुविधा नसलेल्या मोबाईल वारकर्त्यांसाठी 123 PAY ही UPI प्रणाली सुरू करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. सध्या UPI पेमेंट सुविधा ही फक्त इंटरनेट कनेक्शन असलेल्या स्मार्टफोन वापरकर्त्यांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या वापरकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करणे गरजेचे आहे, असे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. त्यासाठीच आरबीआयद्वारे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचाः क्रिकेटचे नियम बदलणार, जाणून घ्या कोणत्या नियमांत करण्यात आला बदल!)
या सेवांचा लाभ घेता येणार
123PAY द्वारे आता स्मार्टफोन किंवा इंटरनेटची सुविधा नसलेल्या फोनद्वारे ग्राहकांना पेमेंट करणे, बिलं भरणे, फास्टटॅग रिचार्जिंग आणि बँक खात्यातील शिल्लक तपासणे यांसारख्या सेवांचा लाभ घेता येणार आहे.
अशी असणार सुविधा
- यातील IVR(Interactive Voice Response)प्रणालीद्वारे आर्थिक व्यवहारांसाठी वापरकर्ते मिस्ड कॉल करू शकतात.
- साध्या फोनसाठी सुद्धा एक मोबाईल अॅप तयार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये स्कॅन पेमेंट वगळता UPI द्वारे होणारे सर्व व्यवहार करता येणार आहेत.
(हेही वाचाः दुर्दैवी! स्फोटके निकामी करतानाच झाला स्फोट)
Join Our WhatsApp Community