dil chahta hai fort : ‘दिल चाहता है’ मधील चापोरा किल्ल्याचा काय आहे इतिहास?

28
dil chahta hai fort : 'दिल चाहता है' मधील चापोरा किल्ल्याचा काय आहे इतिहास?

गोव्यात असलेला चापोरा किल्ला हा ‘दिल चाहता है’ चित्रपटातला किल्ला म्हणूनही ओळखला जातो. या किल्ल्यावर चित्रपटात दिसणारं तीनही नटांच्या आयुष्याविषयी चर्चा करतानाचं एक सुंदर दृश्य चित्रित केलं गेलं होतं.

हा किल्ला वागाटोर बीचजवळ आहे. जर तुम्ही तुमची सुट्टी घालवण्यासाठी गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर इथल्या चापोरा किल्ल्याला नक्की भेट द्या. चापोरा किल्ला हा गोव्यातल्या सर्वांत मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्यावरून समुद्राचं अखंड आणि भव्य दृश्य दिसतं. वागाटोर बीच, अंजुना बीच आणि चापोरा बीच या तीनही ठिकाणावरून या किल्ल्यावर पोहोचता येतं. (dil chahta hai fort)

हा किल्ला उत्तर गोव्यात आहे. या ठिकाणी बागा बीच, कलंगुट बीच आणि कॅन्डोलिम बीचसारखी आणखीही लोकप्रिय ठिकाणं आहेत. तुम्ही बाईक किंवा कार भाड्याने घेऊन, तुम्ही गोव्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकता. तसा चापोरा किल्ल्यापर्यंतचा ट्रेक खूपच लांब, उंच आणि खडकाळ आहे. म्हणून किल्ल्यावर जाताना तुम्ही तुमचे सर्वोत्तम बूट घाला. तसंच गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊन असते. म्हणून तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी कायम पाणी सोबत ठेवा.

(हेही वाचा – ssc gd constable : एसएससी जीडी कॉन्स्टेबलचा जॉब प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या काय असतात?)

चापोरा किल्ल्याच्या इतिहासाची एक झलक

हा किल्ला आदिलशाहच्या वंशाने बांधला होता. त्यानंतर तो पोर्तुगीजांनी १७१७ साली ताब्यात घेतला. त्यानंतर मराठ्यांनी पोर्तुगिजांचा पराभव करून हा किल्ला ताब्यात घेतला.

चापोरा किल्ला हा मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे तिथे एक महत्त्वाची लष्करी चौकी तरार झाली. या चौकीमुळे शत्रूकडून होणार्‍या आक्रमणांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि बचाव करण्यासाठी एक सोयीस्कर ठिकाण मिळालं.

मराठा आणि पोर्तुगीजांची ही लढाई वर्षानुवर्षं सुरू होती. सर्वांत शेवटी हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. पण सततच्या लढाई आणि आक्रमणामुळे किल्ल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तिथली लष्करी चौकी हटवण्यात आली. आता या किल्ल्याचे अवशेष एक ऐतिहासिक वास्तू म्हणून उभे आहेत. (dil chahta hai fort)

(हेही वाचा – औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे Abu Azmi निलंबित; सुधीर मुनगंटीवारांनी केले जोरदार भाषण)

चापोरा किल्ल्याच्या आसपास करण्यासारख्या इतर गोष्टी

चापोरा किल्ल्यावर फिरून झाल्यानंतर तुम्ही बिथरून हाकेच्या अंतरावर असलेल्या वागाटोर बीचवर जाऊन सनबाथ घेऊ शकता किंवा समुद्राच्या पाण्यात मनसोक्त जलक्रीडा करू शकता.

इथून अंजुना बीचसुद्धा जवळच आहे. तसंच इथलं प्रसिद्ध फ्ली मार्केट आणि गजबजलेल्या नाईटलाइफचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. (dil chahta hai fort)

(हेही वाचा – oarfish : ओअरफिश या माश्याचं रहस्य काय आहे? हा मासा खरोखर समुद्री राक्षस आहे का?)

चापोरा किल्ल्यावर कसं पोहोचायचं?

चापोरा किल्ल्यावर पोहोचणं अगदी सोपं आहे. इथे तुम्ही बाईक किंवा कॅब भाड्याने घेऊन गुगल मॅपच्या सहाय्याने पोहोचू शकता.

या किल्ल्यावर तुम्ही सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत फिरू शकता. चापोरा किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रवेश शुल्क आकारलं जात नाही. (dil chahta hai fort)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.