-
ऋजुता लुकतुके
बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांबरोबरच चित्रपट गायक आणि संगीतकारांनाही हल्ली कोट्यवधी रुपये मिळतात. पण, एक काळ असा होता की, गायकांची बिदागी फक्त हजारच्या पटीत होती. आणि ओळख निर्माण होईपर्यंतची धडपड तर सांगण्याची सोय नाही. असाच एक स्टार आहे पंजाबचा दिलजीत दोसांझ. त्याची बॉलिवूड गायक म्हणून पहिली कमाई होती रुपये ३,०००. पण, तिथपासून त्याने स्वत:च्या मालकीचं खाजगी जेट ते १७२ कोटी रुपयांची मालमत्ता अशी मजल मारली आहे. (Diljit Dosanjh Net Worth)
(हेही वाचा- Fastest Ball in Cricket History : रावळपिंडी एक्स्प्रेसचा हा विक्रम आहे आजही अबाधित)
त्याचा जन्म पंजाबमधील एका छोट्या गावात झाला. वडील बसचालक होते. पण, पंजाबी घरांत सगळ्यांना असते तशीच दलजितला संगीताची आवड होती. १६ व्या वर्षी तो गावात आणि भोवतालच्या गावात गुरुद्वारांमध्ये संगीतचे कार्यक्रम करायला लागला होता. अगदी वाढदिवसाच्या कार्यक्रमातही तो गात असे. पण, अठराव्या वर्षीच त्याला त्याचा पहिला अल्बम काढण्याची संधी मिळाली. आणि तो पंजाबमध्ये घरा घरांत पोहोचला. तिसरा अल्बम ‘स्माईल’ तर सुपर हिट झाला. आणि तिथून त्याने मागे वळून पाहिलं नाही. (Diljit Dosanjh Net Worth)
तिथून २०११ मध्ये त्याने पंजाबी सिनेमातही पदार्पण केलं. त्याचा लायन ऑफ पंजाब हा पहिला सिनेमा तर फ्लॉप झाला. पण, त्यातील दलजितने गायलेलं लक २८ कुडी दा, हे गाणं चांगलंच गाजलं. गायक – अभिनेता म्हणून पंजाबी चित्रपट क्षेत्रात त्याची वेगळी ओळख निर्माण झाली. पुढे हिंदीतही गुड न्यूज, उडता पंजाब आणि अमर सिंग चमकिला यासारखे त्याचे चित्रपट गाजले. (Diljit Dosanjh Net Worth)
(हेही वाचा- Tirupati stampede : तिरूपती मंदिरात चेंगराचेंगरी; सहा भाविकांचा मृत्यू, अनेकजण गंभीर)
दलजितने स्वत:चं खाजगी जेट कसं खरेदी केलं याचीही एक गोष्ट आहे. एका सिनेमासाठी अशा लोकेशनवर पोहोचायचं होतं की, जिथे विमानाची सोय नव्हती. दलजित स्टार असल्यामुळे निर्मात्यांनी त्याच्यासाठी जेटची सोय केली. दलजितने जेटबाहेर एक फोटो काढला आणि ‘नवीन सुरुवात,’ असं म्हणत त्याने तो सोशल मीडियावर टाकला. त्यामुळे सगळीकडे अशी हवा पसरली की, दलजितने स्वत:च खाजगी जेट खरेदी केलं आहे. पण, या घटनेतून प्रेरणा घेऊन दलजितने खरंच स्वत:चं जेट विकत घेतलं. हल्ली आपल्या कन्सर्टसाठी तो देशात आणि विदेशातही जेट वापरतो. (Diljit Dosanjh Net Worth)
फक्त जेटच नाही तर दलजितची इतर कमाईही तगडी आहे. अमरसिंग चमकिला या सिनेमासाठी इम्तियाझ अलीने त्याला ४ कोटी रुपये मानधनापोटी दिले होते. आणि दलजित आपल्या गाण्यांच्या कार्यक्रमासाठीही तितकीच बिदागी घेतो. पंजाबमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, त्याची मालमत्ता १७२ कोटी रुपये इतकी आहे. पण, आपण खाजगी आयुष्य तो लोकांपासून लांब ठेवतो. (Diljit Dosanjh Net Worth)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community