dilwara temple : दिलवाडा मंदिरं म्हणजे काय? ही मंदिरं कुणी बांधली?

71
dilwara temple : दिलवाडा मंदिरं म्हणजे काय? ही मंदिरं कुणी बांधली?
दिलवाडा मंदिरांची ओळख

दिलवाडा मंदिरं ही भारतातल्या राजस्थान इथल्या माउंट आबू नावाच्या थंड हवेच्या ठिकाणी आहेत. ही एकूण पाच जैन मंदिरं आहेत. ही मंदिरं भारतीय संगमरवरी कलाकुसरीची सर्वोत्कृष्ट उदाहरणं आहेत. इथल्या सगळ्या मंदिरांमध्ये आदिनाथांपासून ते वर्धमान महावीरांपर्यंतच्या जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. जैन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट अविष्कार म्हणजे दिलवाडा इथली मंदिरं होय. (dilwara temple)

ही मंदिरं ११व्या १२व्या शतकांमध्ये स्थापन केली होती. या मंदिरांना वास्तुकलेच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. तसंच पर्यटनाच्या दृष्टीनेही या मंदिराला एक विशेष महत्त्व दिलं जातं. जैन धर्मीय लोकांसाठी ही मंदिरं त्यांची महत्वाची प्रार्थनास्थळं आहेत.

ही मंदिरं तुम्ही बाहेरून पहिलीत तर तुम्हाला अगदी सामान्य असल्यासारखी दिसतील. कदाचित कित्येक शतकं ऊन-पाऊस झेलून त्यांची ती अवस्था झाली असावी. पण मंदिरांत प्रवेश केल्यानंतर तिथली कलाकुसर पाहून डोळ्यांचं पारणं फिटून जातं.

(हेही वाचा – powai mumbai maharashtra : मुंबईतील ’पवई’ विभाग का आहे इतका प्रसिद्ध?)

मंदिरं कोणी बांधली?

दिलवाडाची ही मंदिरं ११ ते १२व्या शतकात गुजरात इथल्या सोलंकी घराण्याच्या राज्यकर्त्यांनी बांधली होती. या मंदिराची सगळी वैशिष्ट्यं वास्तूशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. सर्व जैन मंदिरांपैकी या मंदिराचं स्थान सर्वांत महत्वाचं मानलं जातं. आग्र्याच्या ताजमहालच्या संगमरवरी दगडाने केलेल्या बांधकामाच्या मंदिरांशी तुलना केली तर, ताजमहाल वास्तू म्हणून भव्य आहे. पण दिलवाडाची मंदिरं ही संगमरवरी दगडांवर कोरलेल्या अतिशय बारीक कलाकुसरीच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. (dilwara temple)

दिलवाडा मंदिराचं वैशिष्ट्य

दिलवाडा मंदिर परिसर हा जंगलामध्ये डोंगररांगांच्या मधोमध आहे. ही एकूण पाच मंदिरं आहेत. इथल्या प्रत्येक मंदिराची स्वतःची एक वेगळी अशी ओळख आहे. या पाचही मंदिरांच्या भोवती एका उंच भिंतीची तटबंदी उभारलेली आहे. ही पाच मंदिरं या उंच भिंतीच्या आतल्या आवारामध्ये वसलेली आहेत. याच पाच मंदिरांच्या समूहाना दिलवाडा असं नाव देण्यात आलं. महत्वाचं म्हणजे दिलवाडा नावाच्या छोट्याश्या गावामध्ये हे जैन तीर्थक्षेत्र वसलेलं आहे. या छोट्या गावाच्या नावावरूनही ही मंदिरं प्रसिद्ध आहेत.

(हेही वाचा – Real Estate Demand : १ कोटींच्या वर किंमत असलेल्या घरांची मागणी वाढली)

इथल्या पाच मंदिरांपैकी प्रत्येक मंदिराचं स्वतःचं एक असं वैशिष्ट्य आहे
  • पहिलं म्हणजे विमल वसाही मंदिर. हे मंदिर पाहिले तीर्थंकर ऋषभनाथ म्हणजेच आदिनाथ यांना समर्पित केलेलं आहे.
  • दुसरं म्हणजे लुना वसाही मंदिर. जैन धर्माचे बावीसावे तीर्थंकर नेमिनाथ यांना हे मंदिर समर्पित केलेलं आहे.
  • तिसरं मंदिर म्हणजे पित्तल्हार मंदिर. हे मंदिर आदिनाथांना समर्पित केलेलं आहे.
  • चौथ्या क्रमांकाचं पार्श्वनाथ मंदिर. हे मंदिर जैनांचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांना समर्पित केलेलं आहे.
  • सर्वात शेवटचं पाचवं मंदिर हे महावीर स्वामी मंदिर आहे. जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर वर्धमान महावीर यांना समर्पित केलेलं आहे.

दिलवाडा मंदिरांच्या पाच संगमरवरी मंदिरांपैकी विमल वसाही आणि लुना वसाही ही मंदिरं सर्वात प्रसिद्ध आहेत. अष्टपद, गिरनार, शत्रुंजय आणि शिखरजी यांसोबत दिलवाडा मंदिरं ही श्वेतांबर पंचतीर्थ म्हणजेच पाच प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात. (dilwara temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.