राज्यात नव्या कोळ्याच्या प्रजातीचा शोध

110

महाराष्ट्रामधून ट्रॅपडोर कोळी या प्रजातीच्या कॉनोथीले या पोटजातीमधील एका नव्या प्रजातीचा शोध संशोधकांनी लावला आहे. या कोळ्याचे नामकरण कॉनोथीले ओगलेई असे करण्यात आले आहे. ओगलेई ही कॉनोथीले या पोटजातीमधील भारतामधून शोधण्यात आलेली सहावी प्रजाती आहे. वन्यजीव अभ्यासक हेमंत ओगले यांच्या आंबोलीच्या संवर्धन कार्यातील योगदानाचा गौरव करत या प्रजातीला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

संशोधनात महत्वपूर्ण भूमिका

कॉनोथीले या पोटजातीमध्ये जवळपास ३४ प्रजातींची जगात नोंद असून त्या मधील सहा प्रजाती भारतामध्ये आढळून येतात. २०१६ मध्ये अक्षय खांडेकर आणि स्वप्नील पवार हयांना सर्वप्रथम कॉनोथीले ओगलेई आंबोली मध्ये आढळला. राजेश सानप यांनी त्याचे बाह्यांग परीक्षण केल्यानंतर ही प्रजाती नवीन असल्याचे सिद्ध केले. जीवशास्त्रज्ञ राजेश सानप यांच्याबरोबर स्वप्नील पवार, अक्षय खांडेकर आणि अनुराधा जोगळेकर यांनीही या संशोधनात महत्वपूर्ण भूमिका बजावली असून हे काम आर्थ्रोपोडा सिलेक्ट या स्वशोधन पत्रिकेमध्ये २९ मार्च २०२२ ला प्रकाशित करण्यात आले.

( हेही वाचा : १ एप्रिलपासून एसटी पूर्ण क्षमतेने धावणार )

ट्रॅपडोर कोळी हे त्यांच्या एका विशिष्ट प्रकारच्या घर बनवण्याच्या गुणधर्मामुळे ओळखले जातात. हे कोळी जमिनीमध्ये बीळ बनवतात. हे बीळ एका दाराच्या सहाय्याने बंद केलेले असते. दारावर दगड, माती, पालापाचोळा इत्यादी पसरून ते लपवले जाते जेणेकरून हा सापळा सहजासहजी नजरेत पडत नाही. दाराबाहेर कोळी आपले चिकट जाळे पसरून ठेवतो. जेव्हा एखादे भक्ष्य जाळ्यावर जाते, तेव्हा बिळाच्या आत दबा धरून बसलेल्या कोळ्याला जाळ्याचे कंपने जाणवतात व तो दरवाज्यातून बाहेर येऊन भक्ष्यावर झडप घालतात. या अनपेक्षित हल्ल्यातून सुटणे भक्ष्याला सहज शक्य नसते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.