दिवाळी सणाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लुकलुकणारे दिवे, दारापुढे कंदील, सुबक रांगोळी, फराळ, रोषणाई करून देशभर मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवशी श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते आणि म्हणूनच प्रजाजनांनी संपूर्ण नगरीत दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते, असे सांगितले जाते. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत दिवाळी साजरी केली जाते.
वसुबारस
दिवाळीच्या सणाला ‘वसुबारस’पासून प्रारंभ होतो. कार्तिक महिन्याच्या द्वादशीच्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण गुजरात आणि आंध्र प्रदेशात ‘वाघ बारस’ आणि देशाच्या इतर भागात ‘गुरु द्वादशी’ किंवा ‘गोवत्स द्वादशी’ म्हणूनही साजरा केला जातो. हिंदू धर्मात गायीला माता संबोधले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. तसेच, भारत हा कृषीप्रधान देश आहे. म्हणून शेतीचा आधार असलेल्या गायीच्या सन्मानार्थ वसुबारस साजरे केली जाते.
(हेही वाचा – रंगीबेरंगी पणत्यांची आरास…)
वसुबारस पूजा
या दिवशी गायी वासराला अंघोळ घालून, पूजा करुन फुलांची माळ गायी वासराच्या गळ्यात घालतात. स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
Join Our WhatsApp Community