दिवाळीला ‘फॅशनची’ नवी मांदियाळी

136

दिवाळीत बाजारपेठा बहरून जातात. दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात विविध वस्तूंचे आगमन होऊन बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. पारंपरिक दिवाळीला फॅशनची नवी जोड प्राप्त होऊन दिवाळीच्या प्रत्येक वस्तूंवर आधुनिकतेचा प्रभाव आढळतो. देशातील कंदील, फटाके, पणत्या, रोषणाई, दिवाळी पोशाख यांना परदेशातदेखील अधिक मागणी आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिकतेचा आधुनिक साज चढत आहे.

पारंपरिकतेला मॉडर्न टच

फॅशनच्या दुनियेत दिवाळीत मात्र पारंपरिक पोशाखाला पसंती मिळते. महिलांच्या साडीवर मॉडर्न दागिन्यांचा शृंगार करण्यास महिला वर्ग उत्साही असतो. कंदीलावर आता पैठणीचा जरतारी मोर शोभून दिसतो, काही भागात विणलेले कंदील देखील विशेष आकर्षणाचा घटक ठरत आहेत. तर, पणत्यांची रुपरेषा बदलून सुगंधी दिवे, काचेचे दिवे, जास्त वेळ चालणा-या दिव्यांना बाजारात पसंती मिळत आहे. भारतीय फराळाला परदेशी बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. तर, ठिपक्यांच्या रांगोळीची जागा कृत्रिम छाप्याच्या साच्यांनी घेतली आहे.

(हेही वाचा-पारंपरिक दिवाळीसाठी ऑनलाईन बाजारपेठा बहरल्या… भन्नाट ऑफर्सचे फुटतायंत फटाके)

फुलल्या मॉलच्या बाजारपेठा

लालबाग, दादर, ठाणे, धारावी अशा मोक्याच्या ठिकाणी ग्राहक विशेष गर्दी करतात. या बाजारपेठांमध्ये नवनवीन वस्तू खरेदी करण्यात ग्राहकांचा कल असतो. पण अलिकडच्या काळात मॉलमध्ये एकाच ठिकाणी सर्व वस्तू प्राप्त होत असल्यामुळे बाजारपेठांचा ग्राहक वर्ग मॉलकडे वळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.