-
ऋजुता लुकतुके
या आठवड्यात आणि खासकरून शुक्रवारच्या दिवशी चर्चेत असलेला एक शेअर म्हणजे डिक्सॉन टेक्नोलॉजीजचा शेअर. मागच्या ५ दिवसांत मिळून या शेअरमध्ये एकूण ३५६ अंशांची म्हणजेच २ टक्क्यांची घट झाली आहे. पण, ही घट एकाच दिवसात भरून निघेल अशी बातमी शुक्रवारी शेअर बाजाराला मिळाली. डिक्सनचीच एक उपकंपनी डिक्सन इलेक्ट्रो मॅनुफॅक्चरिंगने सेलेकॉर गॅजेट्स या कंपनीबरोबर एक महत्त्वाचा करार केला आहे. या करारानुसार, डिक्सन कंपनी सेलेकॉरला रेफ्रिजरेटरने काही महत्त्वाचे सुटे भाग पुरवणार आहे. या बातमीमुळे या शेअरमध्ये सकाळच्या सत्रात चांगली उसळी दिसून आली होती. (Dixon Technologies Share Price)
(हेही वाचा- Spicejet Share Price : स्पाईसजेटच्या शेअरमध्ये एका आठवड्यात १५ टक्क्यांची उसळी कशामुळे आली?)
पण, दुपारी शेअर बाजारात झालेल्या घसरणीत हा शेअरही विक्रीच्या तडाख्याखाली आला. आणि शुक्रवारी दिवस संपताना डिक्सन टेक्नोलॉजीचा शेअर ३९ अंशांच्या किरकोळ घसरणीसह १७,९९९ वर बंद झाला आहे. (Dixon Technologies Share Price)
डिक्सन कंपनीने अलीकडे काही महिन्यात केलेला हा दुसरा मोठा करार आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात डिक्सनने विवो फोनबरोबर एक करार केला असून त्या अंतर्गत विवोचे फोन भारतात बनवण्यासाठी एक संयुक्त कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. आणि त्यातील मोबाईल फोन उत्पादनाची जबाबदारी डिक्सनवर असेल. नवीन स्थापन होणाऱ्या या कंपनीत ५१ टक्के हिस्सेदारीही डिक्सनचीच असेल. या सकारात्मक बातम्यांचा परिणाम डिक्सनच्या शेअरवर येणाऱ्या दिवसांत दिसू शकतो. (Dixon Technologies Share Price)
(हेही वाचा- सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान रविवारी Mega Block)
सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत डिक्सन कंपनीने नफ्यात तिप्पट वाढ नोंदवली आहे. कंपनीचा नफा आता ४११ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये मागच्या महिनाभरात तब्बल १५ टक्क्यांची म्हणजे २,३८१ अंशांची वाढ झाली आहे. त्यानंतर सध्या शेअरवर थोडा नफारुपी विक्रीचा जोर जाणवतो आहे. (Dixon Technologies Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. आणि गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी विक्रीवर सल्ला देत नाही.)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community