उष्माघात – कारणे, लक्षणे आणि उपाय!

144

सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जून या महिन्यांमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव असतो. प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात उष्माघाताचा प्रभाव आढळून येतो. उष्माघाताने मृत्यू होऊ नये यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.

उष्माघात होण्याची कारणे

  • उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे.
  • कारखान्यात बॉयलर रूममध्ये काम करणे.
  • जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे.
  • घट्ट कपड्यांचा वापर करणे.
  • प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

उष्माघाताची लक्षणे

  • थकवा येणे
  • ताप येणे
  • त्वचा कोरडी पडणे
  • भूक न लागणे
  • चक्कर येणे
  • निरुत्साही होणे
  • डोके दुखणे
  • रक्तदाब वाढणे
  • मानसिक बैचेन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था

प्रतिबंधात्मक उपाय 

  • वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
  • कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.
  • उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे कपडे) वापरू नयेत.
  • सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.
  • जलसंजीवनीचा वापर करावा.
  • पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.
  • उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम करणे थांबवावे.
  • उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा उपरणेचा वापर करावा.

उपचार पद्धती

  • रुग्णास हवेशीर व वातानुकूलित खोलीत ठेवावे.
  • रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
  • रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी.
  • रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, किंवा आइस पॅक लावावेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी गृहभेटी देऊन जनतेला उष्माघाताची कारणे, लक्षणे व प्राथमिक उपाययोजना त्याचप्रमाणे उष्माघात होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, याबाबत पुरेशी माहिती द्यावी. 1 एप्रिल ते 26 मे 2022 हा उष्माघात कालावधी असून या कालावधीत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.