पावसाळा हा डासांच्या प्रजननाचा उत्तम काळ मानला जातो, अशा परिस्थितीत तुम्हाला डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया तापाचा धोका असू शकतो. या समस्या टाळण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. यापैकी एक म्हणजे मच्छर कॉइल (Mosquito Quail) जाळणे. त्यातून निघणारा धूर डासांना मारक ठरू शकतो, पण तो मानवांसाठी तितकाच घातक आहे. आपल्या पर्यावरणालाही डासांच्या कॉइलचे वाईट परिणाम भोगावे लागतात. त्याच्या विषारी धुरामुळे हवा प्रदूषित आणि विषारी बनते. ते वापरल्यानंतर आपण आपले हात धुतो, तेव्हा ते पाणी नाल्यांमधून नदीमध्ये मिसळते आणि तेथील प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. डासांच्या कॉइलच्या धुरामुळे होणाऱ्या रोगांविषयी जाणून घेऊन कॉइलला पर्याय शोधावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Nashik : नाशिकचे रस्ते यांत्रिक झाडूने स्वच्छ होणार)
कर्करोग – डासांची कॉइल (Mosquito Quail) सतत जाळल्याने घरातील वातावरण दूषित होते. डासांच्या कॉइलच्या सतत संपर्कात राहिल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असा
डोळ्यांची जळजळ – डासांच्या कॉइलमधून बाहेर पडणाऱ्या धुराच्या संपर्कात आल्याने डोळ्यात जळजळ आणि डोकेदुखीचा त्रास होतो.
नवजात बाळाला धोकादायक – घरात ६ वर्षांपेक्षा कमी वयाचे नवजात किंवा लहान मूल असेल तर त्याच्या आजूबाजूला कॉइल पेटवू नये. यातून निघणारा धूर त्यांच्या आरोग्यासाठी विषासारखा असून अनेक गंभीर आजारांना कारणीभूत आहे.
श्वासोच्छवासाची समस्या – काही लोक डासांपासून वाचण्यासाठी त्यांच्या पलंगाखाली कॉइल जाळतात. असे करणे म्हणजे स्वतःचा जीव घेण्यासारखे आहे. वास्तविक, कॉइलमधून निघणारा धूर थेट व्यक्तीच्या शरीरात जातो. (Mosquito Quail)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community