दिवसाची सुरुवात गरम पाणी, लिंबू पाणी, हळद पाणी किंवा इतर आरोग्यदायी पेय पिऊन केल्यास शरीर निरोगी राहते. काही जण नियमित व्यायामही करतात, मात्र बहुतांश लोकांना सकाळी उठल्याबरोबर कॉफी किंवा चहा पिऊन दिवसभरातील कामांना सुरुवात करण्याची सवय असते. यामागे असा समज असतो की, कॉफी किंवा चहा प्यायल्यास शरीरातील उत्साह वाढतो.
सकाळी उठल्यावर एक तासाच्या आत कॉफी प्यायल्यामुळे झोप उडायला मदत होते, उत्साह संचारतो, ऊर्जा मिळते, असे तुम्हाला वाटत असले तरीही सकाळी कॉफी पिण्याचे शरीरावर विपरीत परिणामही होऊ शकतात.
(हेही वाचा – Congress : राहुल गांधी यांच्या स्वप्नावर महिला काँग्रेसचे विरजण)
झोपेचे तज्ज्ञ आणि हॅपी बेड्सचे सीईओ रेक्स इसैप यांनी सांगितले, दिवसा आपल्या मेंदूत एडेनोसिन नावाच्या रसायनाची निर्मिती होते. या रसायनामुळे झोप लागायला मदत होते. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे मेंदुतील या रसायनावरही परिणाम होतो. मात्र आहारात कॅफिनयुक्त चहा, कॉफी अशा पेयांचे सेवन केल्यास झोपेवर परिणाम होतो. या पेयांमुळे गाढ झोप लागण्यास अडचण निर्माण होते. अपुऱ्या झोपेमुळे काही शारीरिक व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते.
कॉफी पिण्याची योग्य वेळ…
तज्ज्ञांचे मते, सकाळी उठल्यानंतर कमीत कमी एक तासानंतर कॉफी प्यावी; कारण तुम्हाला जागे ठेवणारे कार्टिसोल हार्मोन्स तोपर्यंत कमी होतात. सकाळी उठताक्षणी शरीरात कार्टिसोल हार्मोन्सचे प्रमाण जास्त असतात तसेच कॅफिनयुक्त पेये अति प्रमाणात सेवन करू नये.
दुपारी 2 वाजल्यानंतर कॉफी पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. याविषयी आहारतज्ज्ञ म्हणतात की, एक कप कॉफी प्यायल्यानंतर 5 ते 7 तासांनंतरही शरीरात अर्धे कॅफिन शिल्लक राहते, त्यामुळे झोपेचा त्रास होत असेल तर दिवसातील शेवटची कॉफी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घ्या.
हेही पाहा –