तुमच्याकडे Credit Card आहे? बॅंक आकारत असलेले हे ‘हीडन चार्जेस’ माहिती आहेत का?

जर तुम्ही क्रेडिट कार्डचा ( Credit Card) वापर हुशारीने केला तर ते पैसे वाचवण्यास उपयुक्त ठरतात. मात्र, या क्रेडिट कार्डांशी संबंधित काही शुल्क आहेत, जे खूप जास्त असतात. सहसा बॅंकर्स (Bank) हे सांगत नाहीत. क्रेडिट कार्ड वापरणा-यांना या शुल्कांची माहिती असावी.

कॅश अॅडव्हान्स फी ( Cash Advance Fee) 

क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे याला कॅश अॅडव्हान्स म्हणतात. अनेक वेळा घाईगडबडीत डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्डमधूनही पैसे काढण्याची चूक होते. क्रेडिट कार्ड कंपन्या युजर्सना एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची परवानगी देतात. परंतु, व्याज जास्त आहे. कॅश अॅडव्हान्सवर इंटररेस्ट फ्री क्रेडिट कालावधीचा कोणताही फायदा मिळत नाही. म्हणजेच खरेदी केल्यानंतर मिळणारा व्याजमुक्त वाढीव कालावधी त्यात मिळत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे खिशाला भारी पडू शकते.

लेट पेमेंट फी ( Late Payment Fee)

देय तारखेपर्यंत किमान पैसे दिले जात नाहीत, तर तुमच्या थकबाकीवर लेट पेमेंट शुल्क आकारले जाते. बॅंका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या सामान्यत: थकीत रकमेवर आधारित लेट पेमेंट आकारतात. बिलाची रक्कम जितकी जास्त असेल तितके लेट पेमेंट असते.

अॅन्युअल मेंटनेंस फी ( Annual maintenance Fee) 

अॅन्युअर मेंटनेंस फी म्हणजेच वार्षिक देखभाल शुल्क आहे. जे खाते मेंटेन करण्यासाठी क्रेडिट कार्ड कंपन्या घेतात. हे शुल्क वर्षातून एकदा घेतले जाते. हे शुल्क वेगवेगळ्या कार्डांवर बदलते. अनेक कार्ड कंपन्या क्रेडिट कार्डवर कोणतेही वार्षिक देखभाल शुल्क आकारत नाहीत.

कॅश प्रोसेसिंग फी (Cash Processing fee) 

जेव्हा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड पेमेंट रोखीने करता तेव्हा सामान्यत: कॅश प्रोसेसिंग फी आकारली जाते. बॅंका तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय नेट बॅंकिंग, चेक पेमेंट आणि मोबाईल बॅंकिंग यासारख्या इतर पद्धतींद्वारे पेम्ंट करण्याची परवानगी देतात.

( हेही वाचा: घराघरांत वापरले जाणारे ‘राॅकेल’ गेले तरी कुठे ? )

रिवाॅर्ड रिडेम्पशन फी ( Reward Redemption Fee) 

क्रेडिट कार्डवर रिवाॅर्ड पाॅईंट देण्याचा उद्देश ग्राहकाला क्रेडिट कार्ड वापरण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. क्रेडिट कार्डचे रिवाॅर्ड पाॅईंट रिडीम करण्यासाठी बॅंक विविध सुविधा देते. एकदा तुम्ही रिवाॅर्ड पाॅइंट्स जमा केले की, तुम्ही बॅंकेने देऊ केलेल्या सोयीनुसार, ते रिडीम करु शकता. परंतु बक्षिसे परत करण्यासाठी अनेकांकडून शुल्क आकारले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here