कोणत्याही प्रकारच्या आजारांमध्ये आर्थिक मदत मिळावी यासाठी मेडिक्लेम ही योजना असते. कर्करोग आणि जीवनशैलीविषयक आजारांसाठी विशेष मेडिक्लेम योजना अस्तित्वात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच प्रकारचे वैद्यकीय उपचार अत्यंत महाग झाले आहेत. त्यामुळे एखादा मोठा जीवघेणा आजार झाला तर त्याचा मोठा अर्थिक फटका सामान्यांना बसतो. अशावेळी निवृत्तकाळासाठी सर्व गोळा केलेली जमा पुंजी देखील खर्ची पडते. अशा स्थितीत वैद्यकीय विमा म्हणजेच मेडिक्लेम विमा असणे काळाची गरज बनली आहे. तुम्ही देखील मेडिक्लेम काढताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
(हेही वाचा – तुमच्या नखांच्या रंगावरून जाणून घ्या आरोग्यस्थिती)
मेडिक्लेम काढताना कोणती काळजी घ्यावी…
- अनेक ऑफिसेसमधून आपल्या कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम योजनेचे संरक्षण देण्यात येते. जर एखाद्या कर्मचाऱ्याला अचानक अजारपण आले तर त्या योजनेद्वारे संरक्षण देण्यात येते. मात्र जर कर्मचाऱ्याने कंपनी सोडली तर आधीच्या कंपनीची योजना संबंधित कर्मचाऱ्याला लागू होत नाही.
- एखादी कंपनी ज्याप्रमाणे आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची पॉलिसी उतरविते, त्या प्रमाणे कुटुंबासाठी देखील मेडिक्लेम योजना उतरविता येते. जर तुम्ही वैयक्तिक मेडिक्लेम वापरला नाही तर त्या वर्षाच्या मेडिक्लेम संरक्षणातील रकमेचा काही भाग पुढील वर्षी खरेदी केलेल्या पॉलिसीमधील संरक्षण रकमेत बोनसच्या रूपाने जमा केला जातो.
- सध्या किमान ५ लाख रूपयांचा तरी मेडिक्लेम लोकं काढत असतात.जितक्या कमी वयात हा मेडिक्लेम काढला जातो. तितकाच वयाच्या अनुषंगाने त्याचा प्रिमियम कमी आकारला जातो.
- जर तुम्ही वैयक्तिक मेडिक्लेम घेतला तर त्याच्या प्रिमियमची रक्कम वर्षाअखेरीस भरावी लागते. तुमच्या वयाच्या, आरोग्यास्थितीनुसार, तुमच्या घरात असलेला आजारांचा पूर्व इतिहास बघता, तुम्ही मेडिक्लेम योजना काढवी.