Dal: दररोजच्या आहारात डाळ असावीच का ? डाळ खाल्ली नाही तर काय होईल ?

112
Dal: दररोजच्या आहारात डाळ असावीच का ? डाळ खाल्ली नाही तर काय होईल ?
Dal: दररोजच्या आहारात डाळ असावीच का ? डाळ खाल्ली नाही तर काय होईल ?

डाळी (Dal) आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. भारतीय जेवणात डाळींचा वापर प्रामुख्याने केला जातो. कारण डाळींमध्ये अनेक पोषक घटक असतात. डाळ (Dal) हा आहारातील अत्यंत आवश्यक घटक असूनदेखील डाळींच्या बाबतीत अजूनही काही लोकांना डाळींचे महत्त्व माहीतच नाही. आपल्या आरोग्यासाठी डाळी कशाप्रकारे उपयुक्त ठरतात हे अनेक लोकांना ठाऊक नसते. डाळींमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, डाळींचे सेवन केल्यावर पोट तृप्त झाल्याची भावना निर्माण होते आणि नंतर बराच काळ भूक लागत नाही. याशिवाय, निरोगी आरोग्य, योग्य वजन, त्वचेचं स्वास्थ्य आणि काळेभोर मजबूत केस या सर्वांवर एक उपाय म्हणजे रोजच्या आहारात डाळीचा समावेश करावा. (Dal)

(हेही वाचा –Ukhane in Marathi for Male : पारंपरिक नवरदेवाचे नवे उखाणे)

प्रथिनांचा मुख्य स्त्रोत म्हणजे डाळी. (Dal) आठवड्यातून एकदाही डाळ न खाणे म्हणजे अनेक आजारांना, समस्यांना स्वतःहून आमंत्रण देण्यासारखं आहे. एकूणच शरीराच कार्य व्यवस्थित चालण्यासाठी रोजच्या आहारात डाळींचा समावेश असणं आवश्यक आहे. तो जर नसेल तर वजन वाढण्यापासून केस गळण्यापर्यंत अनेक परिणामांना सामोरं जावं लागतं. आयुर्वेदानुसार कोणत्याही गोष्टी आपल्याला पटेल तेव्हा खाल्ली तर त्यामुळे शरीरात विषारी तत्व निर्माण होऊ शकतात. यामुळे कफ, पित्त आणि वात होण्याची शक्यता असते. यामुळे डाळ योग्य वेळेतंच खावी. (Dal)

(हेही वाचा –SSC Result 2024 : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के)

डाळ खाण्याचे फायदे

  • डाळ (Dal) एक प्लांट बेस्ड प्रोटीन आहे, ज्यामुळे मांसपेशी मजबुत होतात. आरोग्य चांगले राहते आणि पोट हेल्दी राहते. पचनक्रिया चांगली राहते.
  • डाळीत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटामीन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, आयर्न, फायबर, मॅग्नेशियम असतात, ज्यामुळे शरीराला भरपूर फायदे मिळतात. (Dal)
  • डाळीत (Dal) कॅाम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात जे खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढत नाही.
  • कार्बोहायड्रेट्स लेव्हल हाय नसेल तर तुम्ही रेग्युलर डाळीचे (Dal) सेवन करा. हाय कोलेस्टेरॅालमुळे हार्ट डिसिजचा धोका वाढतो.
  • जर तुमच वजन सतत वाढत असेल तर डाळ (Dal) आवर्जुन खा. यात फायबर, प्रोटीन्स असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. याशिवाय कॅलरीज इन्टेक कमी असतो. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोकाही कमी होतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.