beed शहराचा पौराणिक इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

112
beed शहराचा पौराणिक इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

बीड (beed) हे महाराष्ट्रात असलेलं मध्ययुगीन काळातलं एक ऐतिहासिक शहर आहे. बीड शहराच्या पायाभरणीचा इतिहास सांगायचा तर.. पौराणिक कथेप्रमाणे बीड हे शहर पूर्वी पांडव आणि कुरुंच्या काळात दुर्गावती या नावाने प्रसिद्ध होतं. नंतर शहराचं नाव बदलून बालनी असं ठेवण्यात आलं. विक्रमादित्यची बहीण चंपावती हिने हे शहर ताब्यात घेतल्यानंतर त्याचं नाव चंपावतीनगर असं ठेवलं गेलं. त्यानंतर पुढे हे शहरावर चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या राजवटींनी राज्य केलं. तरी तत्कालीन देवगिरी म्हणजेच सध्याच्या दौलताबाद इथल्या यादव शासकांनी या शहराची स्थापना केली असावी असं काही विद्वानांचं म्हणणं आहे.

(हेही वाचा – Patrakar Sanrakshan Kayda विषयी लवकरच नोटिफिकेशन काढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन)

तुघलक याने या शहरामध्ये आणि शहराच्या आजूबाजूला एक किल्ला आणि अनेक विहिरी बांधल्या. त्यानंतर या शहराचं नाव बीर किंवा भीर (विहीर या अर्थाचा अरबी शब्द) असं ठेवलं. त्या भीरचा अपभ्रंश होऊन या शहराचं नाव बीड (beed) झालं असावं. अगदी अलीकडच्या काळापर्यंत या शहरात मोठ्या प्रमाणात विहिरी होत्या. पण पुढे पाणीपुरवठ्याच्या आधुनिक सुविधा आल्या त्यामुळे त्या विहिरींचं महत्व कमी झालं. कालांतराने त्यांपैकी बहुतेक विहिरी बुजल्या गेल्या. बीड हा जिल्हा बालाघाट पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेला आहे त्यामुळे असल्याने जणू काही तो एखाद्या खड्यासारखा भासतो. म्हणून त्याला बिळ असं नाव पडलं असावं असं म्हणतात. पुढे कालांतराने त्या बिळ या शब्दाचं बीड झालं असावं. स्वातंत्र्यानंतर अलीकडच्या काळापर्यंत या शहराला अधिकृत कागदपत्रांमध्ये ‘बीर’ आणि ‘भीर’ म्हणूनच संबोधलं जायचं.

(हेही वाचा – South Africa Tourism : दक्षिण आफ्रिका करणार भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत भागीदारी)

रामायणात म्हटल्याप्रमाणे जेव्हा रावण हा सीता मातेचं अपहरण करून त्यांना लंकेला घेऊन जात होता, त्यावेळी जटायूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. रावणाने जटायूचे पंख कापले. गंभीर जखमी झालेले जटायू जमिनीवर पडले. जेव्हा श्रीराम सीतामातेच्या शोधात तेथे पोहोचले तेव्हा जटायूने त्यांना संपूर्ण कथा सांगितली. गंभीर जखमी झाल्यामुळे जटायूचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला ते बीड (beed) शहरातलं असल्याचं सांगितलं जातं. तसंच त्या ठिकाणी जटाशंकर मंदिर उभं आहे. विद्वानांच्या मते, बीड हे शहर देवगिरीच्या यादवांनी बांधलं असावं असं म्हटलं जातं. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार असंही म्हटलं जातं की, पांडव आणि कुरुंच्या काळात बीड या शहराला दुर्गावती असं म्हटलं जायचं.

(हेही वाचा – aurangabad caves : छत्रपती संभाजी नगर मधील लेण्यांचा जाणून घेऊया इतिहास!)

कंकालेश्वर मंदिर

कंकालेश्वर मंदिराची वास्तू ही बीड (beed) शहरातली सर्वात जुनी आणि सर्वात सुंदर वास्तू आहे. या मंदिराच्या बांधकाम कालावधीबद्दल इतिहासकारांना फारशी खात्री नाही. पण याच्या स्थापत्यशैलीवरून असं आढळतं की, हे मंदिर यादव काळात बांधलं गेलं असावं. या मंदिराच्या रचनेचं एलोराच्या प्रसिद्ध लेण्यांतल्या मंदिरांशी खूप साम्य आहे.

शहराच्या पूर्व दिशेला एका लहानश्या तलावाच्या मध्यभागी वसलेलं हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेलं असून त्यावर मानवी आणि दैवी आकृत्या कोरलेल्या आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिराच्या आवारात जत्रा भरते. हे मंदिर १००० वर्षं जुनं असलं तरीही आजसुद्धा खूप मजबूत आणि नवीनच दिसते.

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांना निवृत्तीवेतनधारकांचे पत्र; ‘लाडका बाबा योजना’ सुरु करण्याची मागणी)

खंडोबा मंदिर

हे मंदिर पूर्व दिशेकडच्या टेकड्यांवर वसलेलं आहे. हे खंडोबा मंदिर हेमाडपंती शैलीमध्ये बांधलेलं असून या शहराचं प्रतीक मानलं जातं. मंदिराच्या समोर दोन अष्टकोनी दिपमाळा उभ्या आहेत. या दिपमाळांवर मानव आणि प्राण्यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आता त्यापैकी बहुतेक मूर्ती खंडित झालेल्या आढळतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.