ट्रेनच्या तिकिटांवर असणाऱ्या RAC, RSWL, CNF या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

4074

संपूर्ण भारतात रेल्वेचे जाळे विस्तारलेले आहे. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवास सर्वाधिक सोयीस्कर समजला जातो. लांब पल्ल्याच्या तिकिटाचे बुकींग केल्यानंतर आपल्या तिकिटावर PNR नंबर, CNF, RAC, WL, RSWL, PQWL अशा विविध शब्दांचा उल्लेख आढळतो. यातील काही शब्दांचा अर्थ आपल्याला परिचित असतो मात्र काही शब्द हे आपण पहिल्यांदाच ऐकत असतो या सर्व शब्दांचा अर्थ माहिती असणे गरजेचे आहे. याविषयी आपण माहिती घेऊ…

( हेही वाचा : मुलीच्या नावे जमा होणार ५० हजार रुपये! जाणून घेऊया ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेविषयी…)

पीएनआर (PNR)

पीएनआर म्हणजे पॅसेंजर नेम रेकॉर्ड जेव्हा तुम्ही रेल्वे तिकिटांचे आरक्षण करता त्यावेळी दहा अंकी पीएनआर क्रमांक दिला जातो, याद्वारे तुम्हाला तुमच्या तिकिटाचा तपशील समजतो.

वेटिंग लिस्ट ( WL)

WL हा कोड प्रतिक्षा यादीत असलेल्या तिकिटांवर लिहिलेला असतो.

जर तुमच्या तिकिटावर GNWL16/WL15 असे लिहिलेले असेल तर तुमच्याआधी १५ प्रवाशांनी बुकिंग केलेल तिकीट रद्द केल्यावर तुमचे तिकीट confirm होऊ शकते.

RSWL (रोड साईड वेटिंग लिस्ट)

RSWL या कोडचा अर्थ रोड साईड वेटिंग लिस्ट असा आहे. हा कोड असल्यास तुमची वेटिंग तिकीट confirm होण्याची शक्यता फार कमी असते.

New Project 48

RAC (आरएसी)

आरएसी या शब्दाचा अर्थ म्हणजे reservation aganist cancelation. RAC म्हणजे दोन प्रवाशांना एकाच बर्थवर प्रवास करण्याची परवानगी आहे. RAC तिकीट confirm होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

CNF

जर तुमच्या तिकिटावर CNF कोड असेल तर तुमचे तिकीट confirm झाले आहे. ट्रेनचा चार्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट क्रमांक दिला जातो.

CAN

जेव्हा एखादा प्रवासी तिकीट रद्द करतो तेव्हा तिकिटावर CAN असे लिहिले जाते.

RLWL (रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट)

रिमोट लोकेशन वेटिंग लिस्टमध्ये तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता सर्वाधिक असते. हा कोटा छोट्या स्टेशनसाठी दिला जातो.

NOSB

रेल्वे १२ वर्षांखालील लहान मुलांच्या तिकिटाचे पैसे आकारते, मात्र त्यांना वेगळी सीट दिली जात नाही. त्यावेळी लहान बालकांच्या नावासमोर NOSB हा कोड लिहिला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.