अॅपलच्या दोन स्टोअरचे उद्धाटन गेल्या आठवड्यात करण्यात आले. देशात हक्काचे स्टोअर सुरू झाल्यावर अॅपल प्रोडक्ट वापरकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. १८ एप्रिलला मुंबईतील बीकेसी भागात पहिल्या स्टोअरचे उद्धाटन करण्यात आले. तर साऊथ दिल्लीतल्या साकेतमध्ये दुसरे अॅपल स्टोअर उघडण्यात आले आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक यांच्या हस्ते देशातल्या दोन्ही स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. या स्टोअरमध्ये काम करणारे कर्मचारी भारताच्या कोणत्याही भागातून आलेल्या ग्राहकाशी संवाद साधू शकतात. कारण त्यांना तब्बल २५ हून अधिक भाषा बोलता येतात. सामान्य स्टोअरच्या तुलनेत अॅपल स्टोअर नक्कीच वरचढ ठरेल. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांचे शिक्षण, त्यांचा पगार याबाबत सामान्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
( हेही वाचा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा : क्रस्ना डायग्नोस्टीकला शेवटची संधी)
परदेशात पूर्ण केले शिक्षण
अॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या सेल्सपर्सनचे शिक्षण ऐकून कोणालाही धक्का बसेल. या आलिशान अॅपल स्टोअरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना प्रोडक्टची योग्य माहिती मिळावी यासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेकडे कंपनीने विशेष लक्ष दिले आहे. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एमबीए, एमटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, बीटेक, रोबोटिक्स सारख्या पदव्या मिळवल्या आहेत. तर काही कर्मचाऱ्यांनी केंब्रिजसारख्या परदेशी विद्यापीठातून डिग्री मिळवली आहे.
कर्मचाऱ्यांना मिळतात हे फायदे
इतर रिटेल स्टोअर्समध्ये सेल्स पर्सनला दर महिन्याला २० ते २५ हजार रूपये पगार मिळतो. इतरांच्या तुलनेत अॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिप्पट, चौपट पैसे मिळतात. इतकेच नाही तर त्यांना विशेष लाभ सुद्धा मिळतात. या लाभांमध्ये वैद्यकीय योजना, आरोग्य लाभ, कुटुंबासाठी स्वतंत्र योजना, शैक्षणिक अभ्यासक्रम इत्यादी योजनांचा समावेश आहे. तसेच सामान्य ग्राहकांपेक्षा इथे काम करणाऱ्यांना अॅपल प्रोडक्ट कमी किंमतीत मिळतात.
पगाराचा आकडा लाखाच्या घरात?
बीकेसीतल्या अॅपल रिटेल स्टोअरमध्ये १०० कर्मचारी काम करतात. तर दिल्ली येथील स्टोअरमध्ये जवळपास ७० कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक लाख रूपये इतका पगार मिळतो.
कंपनी जागेसाठी मोजते इतके भाडे
मुंबईतील अॅपल स्टोअर जवळपास २०,००० स्वेअर फुटमध्ये पसरले आहे. दिल्लीतील स्टोअर मुंबईच्या स्टोअर इतके मोठे नाही. तरी सुद्धा दोन्ही स्टोअरच्या भाड्याचा आकडा समान आहे. मुंबईतल रिटेल स्टोअरसाठी कंपनी दर महिन्याला ४२ लाख मोजणार आहे तर दिल्लीतल्या स्टोअरसाठी ४० लाख भाडे मोजावे लागणार आहे.
Join Our WhatsApp Community