*#0*#, *#06# तुमच्या स्मार्टफोनमधील हे सीक्रेट कोड तुम्हाला माहिती आहेत का? एकदा नक्की डायल करा

102

अलिकडे बहुतांश लोक अँड्रॉइड फोनचा वापर करतात. वर्षानुवर्षे android फोनचा वापर करूनही तुम्हाला आजही फोनमधील अनेक सीक्रेट कोडची कल्पना नसेल. या कोडच्या मदतीने आपण सर्व माहिती मिळवू शकतो. या कोड्सला USSD (Unstructured Supplementary Service Data) असे म्हणतात. फोनमधील वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्हाला विविध कोड्स वापरावे लागतात. फोनच्या डायल बोर्डमध्ये हे कोड Enter करून तुम्ही हवी ती माहिती जाणून घेऊ शकता.

( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा!)

USSD कोडचा वापर करून तुम्ही बॅंकिंग सेवा, पैसे ट्रान्सफर याचाही लाभ घेऊ शकता. USSD कोड हा क्रमांक स्टार (*) ने सुरू होतो आणि हॅश (#) ने समाप्त होतो. USSD कोड 182 वर्णांपर्यंत मोठे असू शकतात. याद्वारे इंटरनेट कनेक्शनशिवाय तुम्ही या मोबाईल सेवेचा लाभ घेऊ शकता.
उदाहरणार्थ *123# हा एक USSD कोड आहे.

मोबाईलचे USSD कोड

*#*#4636#*#* – या कोडद्वारे तुम्हाला फोनची बॅटरी, मोबाइलचे डिटेल, वायफायची माहिती मिळू शकते.

*#06# या कोडला तुम्ही तुमच्या फोनच्या डायल बोर्डमध्ये Enter केल्यावर तुम्हाला फोनचा IMEI आणि MEID नंबर फोनच्या डिस्प्लेवर दिसेल

विशिष्ट कंपनीचे USSD कोड्स

*#0*# – हा केवळ सॅमसंग कंपनीचा सीक्रेट कोड आहे. याचा वापर सॅमसंगच्या फोनमधील हार्डवेयरची माहिती जाणून घेण्यासाठी केला जातो.

*#*#64663#*#* – या कोडचा वापर शाओमी युजर्स करू शकतात या कोडला डायल केल्यानंतर हार्डवेयरची माहिती मोबाईल डिस्प्लेवर दिसेल.

*#800#* – हा कोड केवळ रियल मी या फोनवर काम करतो. हा कोड डायल करून रियलमी युजर्स फॅक्ट्री मोड तसेच फिडबॅक मेन्यू ओपन करू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.