तुम्हाला कुत्रे पाळायला आवडतात? मग हे आहेत Top 10 Dog Breeds !

37
तुम्हाला कुत्रे पाळायला आवडतात? मग हे आहेत Top 10 Dog Breeds !
तुम्हाला कुत्रे पाळायला आवडतात? मग हे आहेत Top 10 Dog Breeds !

सलग तिसऱ्या वर्षी जगातल्या सर्वात लोकप्रिय कुत्र्यांच्या जातीचा किताब फ्रेंच बुलडॉगने (French Bulldog) पुन्हा पटकावला आहे.

अमेरिकन केनेल क्लबने, गेल्यावर्षी वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांची जगातली सर्वात मोठी नोंदणी केली. या नोंदणीमध्ये जगातल्या सर्वांत लोकप्रिय कुत्र्यांच्या जातींसाठी क्रमवारानुसार एक यादी जाहीर केली गेली. क्लबने नोंदणी केलेल्या आकडेवारीचा अंदाज घेऊन टॉप २०० जातींचे कुत्रे निश्चित करण्यात आले होते. (Top 10 Dog Breeds)

या वर्षी फ्रेंच कुत्रे या गटात आघाडीवर आहेत. त्यानंतर लॅब्राडोर रिट्रीव्हर्स (Labrador Retriever) आहेत. २०२२ साली लॅब्राडोर रिट्रीव्हर्स (Labrador Retriever) जातीच्या कुत्र्यांची “सर्वात लोकप्रिय” म्हणून नोंदणी केली गेली होती. गोल्डन रिट्रीव्हर्स, जर्मन शेफर्ड (German Shepherd) आणि पूडल्स (Poodle) या कुत्र्यांच्या जाती पहिल्या पाचामध्ये येतात.

(हेही वाचा – Kalyan Railway Station वर पाण्याची बोंब; जाणून घ्या काय आहे कारण…)

अमेरिकन केनेल क्लबच्या म्हणण्यानुसार, फ्रेंच बुलडॉगची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत खूप वाढली आहे. याचं कारण म्हणजे त्यांचा “खेळकर स्वभाव” आणि “कॉम्पॅक्ट आकार” होय. या दोन गोष्टी त्यांना वेगवेगळ्या जीवनशैलींशी सुसंगत बनवतात. १८९८ साली अमेरिकन केनेल क्लबने या कुत्र्यांना अधिकृतपणे मान्यता दिली आहे. (Top 10 Dog Breeds)

फ्रेंच बुलडॉग (French Bulldog) हे दिसायला गोंडस असतात. याव्यतिरिक्त ते त्यांच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे लहान जागेतही जुळवून घेऊ शकतात. अमेरिकन केनेल क्लबचे कम्युनिकेशन्स एक्झिक्युटिव्ह ब्रँडी हंटर मुंडेन यांनी “गुड मॉर्निंग अमेरिका” ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की,

“फ्रेंच बुलडॉग (French Bulldog) तुमच्या प्रेमात पडलेले असतात. त्यांना बहुतेक वेळा तुमच्यासोबत राहायचं असतं आणि हेच लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करतं.”

गेल्या वर्षीपर्यंत जगातल्या सर्वांत लोकप्रिय जातींच्या कुत्र्यांविषयी जाणून घ्यायचं असेल तर पुढे दिलेली यादी पाहा. (Top 10 Dog Breeds)

(हेही वाचा – कामगारांच्या सुरक्षेबाबत तडजोड करू नये, Uday Samant यांचे आवाहन)

गेल्या वर्षीचे टॉप १० हे आहेत:
  • फ्रेंच बुलडॉग
  • लॅब्राडोर रिट्रीव्हर
  • गोल्डन रिट्रीव्हर
  • जर्मन शेफर्ड डॉग
  • पूडल
  • डॅचशंड
  • बीगल
  • रॉटवेलर
  • बुलडॉग
  • जर्मन शॉर्टहेअर पॉइंटर

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.