Acidity Cure : ॲसिडिटीचा त्रास होतो ? हे वाचा !

आम्ल सहन करण्याची क्षमता त्यात असूनही काही वेळा ते अशा प्रकारे फाटू शकते. असा अल्सर होतो तेव्हा त्या ठिकाणच्या नसा उघडय़ा पडतात आणि त्यावर आम्लाची प्रक्रिया होऊन पोटात दुखते. त्यामुळे अ‍ॅसिडिटीच्या त्रासावर फार काळ घरगुती उपाय न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे तज्ञ सांगतात. 

194
Acidity Cure : ॲसिडिटी त्रास होतो ? हे वाचा !
Acidity Cure : ॲसिडिटी त्रास होतो ? हे वाचा !

आपल्या जठरात आम्ल असतेच. (Acidity Cure) खाल्लेल्या अन्नाचे विघटन करणे, अन्नातील विषाणूंना मारणे आणि अन्नातील सर्व घटक एकत्र करून ते पचनसंस्थेत पुढे सरकण्यास मदत करणे हे त्या आम्लाचे नेहमीचे काम. पोटामध्‍ये आम्‍लाचे (acid चे) प्रमाण अधिक झाल्‍यास ॲसिडिटीचा त्रास होतो. यात तोंडात आंबट चव येणे, छातीत जळजळणे (विशेषतः रात्री जेवल्‍यानंतर), जेवलेले अन्‍न किंवा आंबट पाणी पोटातून परत तोंडात येणे, गिळायला त्रास होणे, अपचन होणे, पोटाच्‍या वरील भागात दुखणे, ही लक्षणे दिसू शकतात. हे पोटात दुखणेही जळजळ झाल्यासारखे दुखते किंवा तीव्र दुखते. (Acidity Cure)

(हेही वाचा – Sharad Pawar On Palestine : केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करू नका; आता देवेंद्र फडणवीसांचीही शरद पवारांवर टीका )

अ‍ॅसिडिटीत पोटात तीव्र दुखत असेल तर जठराच्या आतील अस्तर उघडे पडून तिथे अल्सर (व्रण) झालेला असू शकतो. खरे तर जठराचे आतले आवरण मजबूत असते. आम्ल सहन करण्याची क्षमता त्यात असूनही काही वेळा ते अशा प्रकारे फाटू शकते. असा अल्सर होतो तेव्हा त्या ठिकाणच्या नसा उघडय़ा पडतात आणि त्यावर आम्लाची प्रक्रिया होऊन पोटात दुखते. त्यामुळे अ‍ॅसिडिटीच्या त्रासावर फार काळ घरगुती उपाय न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे तज्ञ सांगतात.

ॲसिडिटीचा त्रास झाल्यास हे करा
  • कॉफी, चमचमीत आणि मसालेदार पदार्थ, अति खाणे टाळावे.
  • अर्धा ग्लास थंड दूध प्यावे. या दुधामध्ये खाण्याचा सोडा १ चमचा टाकून घेतल्यास अ‍ॅसिडिटी त्वरित कमी होते.
  • अ‍ॅसिडिटी झाल्यावर दूधभात, दूध-चपाती किंवा दूध-भाकरी खावी.
  • केळी, सफरचंद, कलिंगड, दही खावे, शहाळ्‍याचे पाणी, ताक प्‍यावे.
  • सतत अ‍ॅसिडिटी होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासण्या कराव्यात आणि उपचार करावेत.
  • ॲसिडिटी होऊ नये यासाठी नियमित व्‍यायाम करावा.  (Acidity Cure)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.