काखेतून दुर्गंधी येणे, ही सर्वसामान्य समस्या आहे. ही दुर्गंधी त्वचेखाली असलेल्या ग्रंथींमधून तेल बाहेर पडल्यामुळे येते. (Beauty Tips) या ग्रंथी काखेभोवतीच असतात. त्यामुळे घामाला दुर्गंधी येते. अनेक परफ्युम, अत्तर अशा सुगंधी वस्तूंचा वापर केला, तरी हा दुर्गंध काही वेळा कमी होत नसल्याचे लक्षात येते. यावर उपाय म्हणून तुरटी फायदेशीर ठरते.
काखेतून घामाचा दुर्गंध पसरू नये, असे वाटत असेल तर, फिटकरीचा वापर करा. तुरटीचा वापर आंघोळीदरम्यानदेखील करू शकता. तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातून घामाचा दुर्गंध पसरत नाही.
(हेही वाचा – UBT : विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब यांना बढती, उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार )
आंघोळीदरम्यान, तुरटीचा वापर कसा करावा, हे क्वचितच लोकांना माहीत असेल. यासाठी एक बादली पाण्यात २ तास तुरटीचा खडा घालून ठेवा. तुरटी पाण्यात विरघळल्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा आणि स्वच्छ टॉवेलने शरीर नीट पुसून काढा. यामुळे काखेतून येणारा दुर्गंधीचा त्रास होणार नाही. यासाठी तुरटी रात्रभर पाण्यात घालून ठेवावी.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community