फळांचा राजा हापूस हा प्रत्येकाच्या आवडीचे फळ असल्यामुळे उन्हाळ्यात प्रत्येक जण आंब्यावर मनसोक्त ताव मारताना दिसत आहेत. परंतु आंबा आरोग्यासाठी उत्तम आहे का? आंब्याच्या गुणधर्माविषयी तज्ज्ञांचे वेगवेगळे मत आहे. आंब्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढत असली तरी, आंब्याचे जास्त सेवन करणे आरोग्याला घातक ठरू शकते याउलट आंबा वजन कमी करण्यास मदत करतो असेही म्हटले जाते. त्यामुळे आंबा खाल्ल्यामुळे खरंच वजन कमी होते का याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
( हेही वाचा : काय सांगता? सरकार देणार घरपोच आंबे ‘या’ संकेतस्थळावरून करा ऑर्डर! )
रोज ३५० ग्रॅमपेक्षा कमी आंबा खावा
आंबा खाल्ल्याने वजन कमी होते की नाही यावर तज्ज्ञांची विविध मते आहेत. आंब्यामध्ये ए, बी-६, सी, ई, कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, फॅट, मॅग्नेशियम, साखर, प्रथिने ही पोषक तत्वे असतात. या गुणधर्मांमुळे वजन कमी होण्यास मदत होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु आंब्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे शरीराला घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते रोज ३५० ग्रॅमपेक्षा कमी आंबा खावा. एका मध्यम आकाराच्या आंब्यात १३५ कॅलरीज असतात यापेक्षा जास्त प्रमाणात आंबा खाल्लात तर मात्र वजन वाढण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community