वाफेवर चालणारी “The fairy queen train” ही खरोखरच अस्तित्वात आहे का?

122
वाफेवर चालणारी
वाफेवर चालणारी "The fairy queen train" ही खरोखरच अस्तित्वात आहे का?

द फेअरी क्वीन ही ट्रेन (The fairy queen train) काही खास दिवसांसाठी नवी दिल्ली ते अलवार या रेल्वेमार्गावरून धावते. या फेअरी ट्रेनचं नाव १९९८ साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘जगातली सर्वांत जुनी, वाफेवर चालणारी आणि अजूनही लोकांसाठी सुरू असलेली लोकोमोटिव्ह’ म्हणून नोंदवण्यात आलं होतं. या टूरिस्ट ट्रेनचं काम १९८२ साली सुरू करण्यात आलं होतं. पुढे १९९९ या दिवशी ट्रेनचं काम बांधून पूर्ण झालेलं होत. वाफेवर चालणारी लोकोमोटिव्ह ही जगातली सर्वांत पहिली फेअरी ट्रेन म्हणून प्रसिद्ध आहे.

इंग्लंडच्या किस्टन, थॉमसन यांनी ही ट्रेन तयार केली होती. हे तिघेही जवळजवळ ५५ पेक्षा जास्त वर्षांपासून या सर्व्हिस इंडस्ट्रीत काम करत आहेत. भारतातल्या इतर ट्रेनशी तुलना केली तर फेअरी क्वीन ही बरीच लहान आहे. या ट्रेनला दोनच डबे आहेत. त्यामध्ये एकावेळी या ट्रेन मधून ५० लोक प्रवास करू शकत होते. (The fairy queen train)

(हेही वाचा – Muslim : मुसलमान तरुणाने हवाई सुंदरीचा केला विनयभंग )

द फेअरी क्वीनचा इतिहास

सुरुवातीला १८५७ च्या उठावाच्या वेळी, पाच फूट सहा इंच गेजच्या लोकोमोटिव्हचा वापर पश्चिम बंगालच्या हावडा आणि राणीगंजदरम्यान लाईट मेल ट्रेनमधून सैन्याच्या गाड्या नेण्यासाठी केला गेला.

त्यानंतर १९४३ साली या फेअरी ट्रेनचा वापर चंदौसी इथल्या झोनल ट्रेनिंग स्कूलसाठी केला गेला. त्यानंतर या ट्रेनला बिहार येथे रेल्वे लाईन सर्व्हिससाठी पाठवलं गेलं. १९०९ सालापर्यंत द फेअरी क्वीनही तिथे होती.

(हेही वाचा – Crime News: निवृत्त शिक्षकाच्या घरात मिनी गन फॅक्टरी! सात जण ताब्यात)

फेअरी क्वीनचा जीर्णोद्धार

१९७२ साली भारत सरकारने द फेअरी क्वीनला राष्ट्रीय वारशाचा दर्जा दिला आणि त्या ट्रेनला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलं.

द फेअरी क्वीनला नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयात विशेष स्थान देण्यात आलं. या रेल्वे संग्रहालायमध्ये भारतीय रेल्वेच्या निकामी आणि ऑपरेशनल मॉडेल्स, त्यांची सिग्नलिंग उपकरणं, वापरलेले प्राचीन फर्निचर, ऐतिहासिक छायाचित्रे, यांचा सर्वसमावेशक इतिहास देते जपून ठेवलेला आहे.

पॅलेस ऑन व्हील्सच्या यशानंतर १९९७ साली लोकोमोटिव्हला कामकाजाच्या निमित्ताने परत आणण्यात आलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.