प्रत्येकाला जीवनात यशस्वी व्हायचे असते. यशस्वी होण्यासाठी माणूस जी काही प्रगती करतो त्यामागे त्याची बुद्धी असते. त्यामुळे मेंदूची काळजी घेणे अत्यावश्यक ठरते. मेंदूला हानीकारक ठरणाऱ्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत.
१. आजरी असताना काम करणे
‘ज्यादा काम, ज्यादा पैसा’ यावर आंधळा विश्वास ठेवून आज प्रत्येकजण काम करतो आहे. कामांचे वाढलेले तास, कार्यालयातला वाढलेला ताण याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो आहे. त्यातही जर आजारपणात काम केले तर मेंदूची ऊर्जा आतून कमी होत राहते. म्हणून कोणत्याही आजाराच्या किंवा दुखापतीच्या वेळी, मेंदूला आणि शरीराला संपूर्ण विश्रांती द्या.
२. जास्त साखर खाणे
शरीरातले साखरेचे प्रमाण मर्यादेपलीकडे गेले तर त्याचे अकल्पनीय परिणाम भविष्यात भोगावे लागतात. अती प्रमाणात साखर खाण्याने स्थूलता तर येतेच पण त्यासोबत मेंदूवरही भयंकर परिणाम होतो. जास्त प्रमाणात साखर खाण्याने स्मरणशक्ती, नैराश्य, अतिक्रियाशीलता यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आहारातील साखर कमी करण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा.
(हेही वाचा – हृदयविकारामुळे का होतोय दर ५५ मिनिटांनी एकाचा मृत्यू?)
३. जेवण वगळणे
अनेकदा कार्यालयीन ताणामुळे भूक लागत नाही किंवा काही खायची इच्छा होत नाही. तर कधी कामाच्या व्यस्ततेमुळे इच्छा असूनही वेळेवर जेवता येत नाही. त्यामुळे अन्नातून मिळणाऱ्या ग्लुकोज आणि पोषक घटकांपासून मेंदू वंचित राहतो. वारंवार अशी परिस्थिती निर्माण झाल्यास मेंदूतील अत्यावश्यक पेशींचा ऱ्हास व्हायला सुरूवात होऊ शकते.
४. तक्रार करणे
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर तक्रार करणारी व्यक्ती कोणालाही आवडत नाही. पण सतत तक्रार करण्याचे मेंदूवरही नकारात्मक परिणार होतात असे संशोधनाअंती समोर आले आहे. प्रत्येक दिवशी ३० मिनिटे तक्रार केल्यास मेंदूचे शारिरीक नुकसान होऊ शकते.
५. मेंदूला विचार करण्यासाठी उत्तेजन द्या
संशोधनातून हे समोर आले आहे की, जास्त किंवा पुरेसा विचार करत नाहीत त्यांची मेंदूशक्ती हळूहळू क्षीण होत जाते. ज्याप्रकारे तंदुरुस्त राहाण्यासाठी शारिरीक व्यायाम आवश्यक आहे, त्याच प्रकारे मेंदूला दररोज थोडा विचार व्यायाम करणे आवश्यक आहे. समस्या सोडवणे, वाचणे, लिहिणे यांचा समावेश बौद्धीक व्यायामात होऊ शकतो.
(आरोग्य विषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community