Curry Leaf Juice : वजन कमी करण्यासाठी प्या ‘या’ सुगंधी पानांचा रस

Curry Leaf Juice : कढीपत्त्याची सुगंधी पाने पदार्थाची रुची वाढवतात. कढीपत्त्याच्या पानांचा रस प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल. तुमचे सडपातळ शरीर पाहून लोक म्हणतील 'व्वा' !

872
Curry Leaf Juice : वजन कमी करण्यासाठी प्या 'या' सुगंधी पानांचा रस
Curry Leaf Juice : वजन कमी करण्यासाठी प्या 'या' सुगंधी पानांचा रस

लठ्ठपणा ही आजच्या जगात एक मोठी समस्या बनली आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात ही स्थिती आहे. यामुळे उच्च रक्तदाब (High blood pressure), हृदयविकाराचा झटका (heart attack), स्ट्रोक आणि मधुमेह (Diabetes) होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या आहारात प्रत्येक वेळी बदल करावे लागतील, अन्यथा समस्या वाढू शकते. मात्र, घाबरून जाण्याऐवजी कढीपत्त्याच्या पानाचा रस प्या आणि परिणाम अनुभवा, असे तज्ञ सांगतात.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : पाणलोटसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल, तर नवीन पदनिर्मिती करावी – उपमुख्यमंत्री)

अनेक पोषक तत्त्वांचा फायदा

कढीपत्ता खूप सुगंधी असतो. दक्षिण भारतीय पाककृतींमध्ये याचा वापर केला जातो. ते चव सुधारण्यासाठी कार्य करते. ग्रेटर नोएडातील जी. आय. एम. एस. रुग्णालयात काम करणाऱ्या प्रख्यात आहारतज्ञांच्या मते, कढीपत्त्यामध्ये लोह (Iron), कॅल्शियम (Calcium), फॉस्फरस (Phosphorus), क जीवनसत्व (Vitamin C) यांसारखी अनेक महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात. ती आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात.

चरबी कमी करण्यासाठी प्रभावी

जर तुमच्या पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागली असेल, तर यासाठी तुम्ही कढीपत्त्याचे सेवन करू शकता, त्यात अल्कलायड्स (alkaloids) असतात, ज्याच्या मदतीने लिपिड्स आणि चरबी कमी केली जाऊ शकते. जर तुम्ही त्याचा रस प्यायलात, तर खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची (triglycerides) पातळी देखील कमी होईल, तसेच रक्तातील साखरेची पातळी राखली जाईल.

(हेही वाचा – Ram Mandir Ayodhya : रामलल्लाची मूर्ती ठरली; कोणती मूर्ती होणार गर्भगृहात विराजमान)

रस कसा तयार करावा ?

कढीपत्त्याचा रस तयार करण्यासाठी, तुम्ही प्रथम कढीपत्त्याची पाने धुऊन पाण्यात उकळून घ्या, काही वेळानंतर गाळणीच्या मदतीने हे पाणी गाळून घ्या आणि ते कोमट झाल्यावर प्या. तुम्हाला हवे असल्यास पाने वाटून त्यात लिंबू आणि मध मिसळा. हा कढीपत्त्याचा रस रिकाम्या पोटी प्यावा. (Curry Leaf Juice)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.