सध्या देशभरात तापमानाने उच्चांक गाठला आहे. उष्ण तापमानात अनेक लोक आइस्क्रिम, बर्फाचा गोळा असे थंड पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. तसेच उष्ण वातावरणात तहान भागवण्यासाठी सर्रास थंड पाण्याचे सेवन केले जाते. परंतु थंड पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असते यामुळे पचनाचे विकार सुद्धा होतात.
( हेही वाचा : सोने विकायचे असेल तर ‘हे’ जाणून घ्या! )
उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या
- अनेक तज्ज्ञ डॉक्टर थंड पाणी न पिण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात आपल्या शरीराचे तापमान साधारण ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास असते. यामुळे थंड पाण्याचे सेवन केल्यानेळ रक्तवाहिन्या आकुंचन पावतात
- उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी सामान्य दिवसांपेक्षा झपाट्याने कमी होते. अशावेळी उन्हातून आल्यावर अनेकजण थंड पाणी पितात. हे शरीरासाठी घातक ठरू शकते.
- थंड पाण्यामुळे ह्रदय गती ( Heart Rate) कमी होते.
- सतत थंड पाण्याचे सेवन केल्याने घशाचे विकार उद्भवतात. उदाहरणार्थ घसा खवखवणे, टॉन्सिल्स किंवा सर्दी होऊ शकते.
- उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्यानंतर शरीरातील तापमानाची योग्य पातळी राखण्यासाठी शरीराला अनावश्यकपणे भरपूर ऊर्जा खर्च करावी लागते. यामुळे थंड पाणी प्यायल्यानंतर थकवा येतो आणि माणूस सुस्त होतो.