Health Tips : पाणी कमी प्यायल्याने शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम, दररोज किती पाणी प्यावे…जाणून घ्या

दिवसातून कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यावे

161
Health Tips : पाणी कमी प्यायल्याने शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम, दररोज किती पाणी प्यावे...जाणून घ्या
Health Tips : पाणी कमी प्यायल्याने शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम, दररोज किती पाणी प्यावे...जाणून घ्या

तहान लागल्यावर किंवा शरीराला आवश्यक आहे तेवढे पाणी पिणे आवश्यक आहे, कारण शरीरात पाण्याची कमतरता झाली, (drinking less water) तर गंभीर आजार होऊ शकतात. रक्ताभिसरण, यकृत आणि किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्वचा कोरडी होणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी आणि पाय दुखणे या समस्या जाणवू शकतात. याकरिता दररोज किती प्रमाणात पाणी पिणे (Health Tips) आवश्यक आहे. जाणून घेऊया –

 – पाणी कमी प्यायल्याने शरीरात युटीआय इन्फेक्शन वाढू शकते याशिवाय शरीराचे तापमानही वाढू शकते.

– कमी पाणी प्यायल्याने रक्ताभिसरणावरही परिणाम होऊ शकतो. पाणी कमी प्यायल्यास रक्तदाबाची पातळी खाली येऊ शकते.

– शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा त्याचा परिणाम किडनीच्या कार्यावर होऊ शकतो. मूतखड्याचा त्रासही होऊ शकतो.

– पाणी कमी प्यायल्यामुळे घशाला कोरड पडते. तोंडामध्ये लाळेचे प्रमाण कमी होते. यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, गिळायला त्रास होणे, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रास होतात.

– त्वचा कोरडी पडणे, निस्तेज होणे असे त्रासही पाणी कमी प्यायल्यामुळे होतात.

(हेही वाचा – ‘तू भी है राणा का वंशज, फेंक जहां तक भाला जाए’ Asian Games 2023 मध्येही नीरज चोप्राला सुवर्ण  )

दररोज किती पाणी प्यावे ? 
दिवसातून कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीर निरोगी राहते. काही वेळा लोकं खाण्याच्या मानाने पाणी कमी पितात. ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी दररोज जास्त पाणी प्यावे. यामुळे चेहऱ्यावर मुरुमं येणे, पित्त येणे असे त्रास टाळता येतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.